संशोधनाचे आरोग्य प्राथमिक पातळीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:19+5:302021-02-05T05:03:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशातील संशोधनाचे आरोग्य अजूनही प्राथमिक पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य संशोधानासाठी यंदाच्या केंद्रीय ...

The health of the research is only at the primary level | संशोधनाचे आरोग्य प्राथमिक पातळीवरच

संशोधनाचे आरोग्य प्राथमिक पातळीवरच

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशातील संशोधनाचे आरोग्य अजूनही प्राथमिक पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य संशोधानासाठी यंदाच्या केंद्रीय अंदाजपत्रकात अवघी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर, नवकल्पना, संशोधन आणि विकासासाठी (इनोव्हेशन, आर अँड डी) पाच वर्षांसाठी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कोरोनाच्या (कोविड-१९) पार्श्वभूमीवर सादर झालेला अर्थसंकल्प तब्बल ९.५ टक्क्यांची तूट घेऊन आला आहे. दरवर्षीच्या अंदाजपत्रकाप्रमाणे यंदाही संशोधनावर अत्यल्प तरतूद असल्याचे दिसून येत आहे. संशोधन, विकास आणि नवकल्पनांवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारने अगामी पाच वर्षांसाठी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अवघ्या काही ओळींमध्ये हे प्रकरण गुंडाळले आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाईल. देशात संशोधनाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्र महत्त्वाचे ठरले आहे. मात्र, आरोग्य संशोधनावर २ हजार ६२३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजकुमार सराफ म्हणाले, संशोधनावर होणारा खर्च अत्यल्प आहे. केलेल्या तरतुदीमध्येही स्पष्टता नसते. कोणत्या क्षेत्रात खर्च करणे आवश्यक आहे, हे निश्चित झाले पाहिजे. मानवाला उपयोगी पडतील अशा विषयांना प्राधान्य द्यायला हवे. खासगी क्षेत्राला देखील संशोधनासाठी पतपुरवठा करायला हवा. मात्र, आपल्याकडे संशोधन आणि विकास हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. माहिती तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक संसंधान निर्मिती, ऊर्जा, कार्बन फूट प्रिंट, वॉटर फ्रूट प्रिंट, कृषी उत्पादन पूरक संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये फारसे काम झाले नाही. प्लास्टिकचा मानवाला खूप उपयोग झाला. मात्र, त्याने पर्यावरणाचे नुकसानही तितकेच केले. त्यावरही संशोधन व्हायला हवे.

----

अमेरिका, रशिया, चीन या देशांमध्ये संशोधन आणि विकासावर अधिक खर्च केला जातो. आपणही शिक्षणाप्रमाणेच संशोधनावर खर्च करायला हवा. मात्र, सध्या संशोधन, विकासावर केलेली पन्नास हजार कोटींची पंचवार्षिक तरतूद अत्यल्प आहे. दरवर्षी दरडोई अवघा दहा रुपये खर्च केला जाणार आहे.

- राजकुमार सराफ, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद

----

आरोग्य संशोधनातील तरतूद कोटींमध्ये

२०२०-२१ २१००

२०२१-२२ २६६३

---

नवकल्पना, संशोधन आणि विकासावर आगामी पाच वर्षांची तरतूद - ५० हजार कोटी

Web Title: The health of the research is only at the primary level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.