‘हेल्थ हार्मनी’मधून मिळेल निरामय आरोग्याचा कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:41+5:302021-03-15T04:11:41+5:30
पुणे : कोरोनाकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सध्याच्या परिस्थितीचा सामना कसा करावा, कुटुंबाचे आरोग्याचे बजेट कसे असावे, याबाबतचा कानमंत्र ...

‘हेल्थ हार्मनी’मधून मिळेल निरामय आरोग्याचा कानमंत्र
पुणे : कोरोनाकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सध्याच्या परिस्थितीचा सामना कसा करावा, कुटुंबाचे आरोग्याचे बजेट कसे असावे, याबाबतचा कानमंत्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेता येणार आहे. प्रफुल्ल कोठारी यांचे डायग्नोपेन डायग्नोस्टिक सेंटर प्रस्तुत आणि डॉ. अनुज गजभिये यांचे हिलर आर्मिस आर्थोपेडिक क्लिनिक यांच्या विशेष सहयोगाने सोमवारी, १५ मार्च रोजी संध्याकाळी ३ ते ५ या वेळेत ‘लोकमत’च्या व्यासपीठावर ‘हेल्थ हार्मनी’ हा कार्यक्रम पार पडणार आहे.
प्रत्येकाच्याच आयुष्यात आरोग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनाच्या संकटाने निरामय आरोग्याचे महत्व ठळकपणे अधोरेखित केले. बदलती जीवनशैली, लहरी ॠतुमान, घड्याळाच्या काट्यांवर धावणारे आयुष्य यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आजकाल आमंत्रण मिळत आहे. याच धावपळीत गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटाची भर पडली. कोरोनामुळे आरोग्याच्या नव्या तक्रारींना आमंत्रण मिळत आहे. कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, रोगप्रतिकारकशक्ती कशी टिकवावी, आहार आणि व्यायाम कसा असावा, याबाबत ‘हेल्थ हार्मनी’ या कार्यक्रमातून वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
पोस्ट कोविड ही सध्याची मोठी समस्या ठरली आहे. कोरोना होऊन गेल्यानंतरही थकवा जाणवणे,श्वास घेण्यास त्रास होणे, मानसिक ताण येणे अशा समस्या कायमच्या पाठीशी लागतात. कोरोनापश्वात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबाबत परिसंवादही रंगणार आहे. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य कसे जपावे, हेही जाणून घेता येणार आहे. यातून निरामय आरोग्याचे समीकरण समजून घेण्यास मदत होईल, असा विश्वास ‘लोकमत’तर्फे व्यक्त करण्यात आला आहे.