शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचा हा कारभार म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 11:46 IST

दीड वर्ष उलटले व शहरातील गरीब-गरजूंना पैसे खर्च करून एक्स-रे काढण्याची वेळ

ठळक मुद्देपालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यातील एक्स-रे मशीन गेल्या दीड वर्षापासून बंदशासनाकडून येणाऱ्या मशीनवर आरोग्य विभागाचे नियोजन

नीलेश राऊत - पुणे : बंद पडलेले एक्स-रे मशीन दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च आहे व नवीन मशीन खरेदीसाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडून टी़बी़ प्रोग्रॅमअंतर्गत मिळणारे एक्स-रे मशीन प्राप्त होताच शहरातील गरीब रुग्णांना मोफत एक्स-रे सेवा दिली जाईल, असे नियोजन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागास राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (टी़बी़ प्रोग्रॅम) केंद्र शासनाकडून मिळणारे एक्स-रे मशीन प्राप्त झाले असून, यासाठी आवश्यक गोष्टींची (डार्क रूम व तत्सम सुविधा) पूर्तता झाल्यावर ते येत्या दहा दिवसांत कार्यान्वित होईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, अद्यापही हे एक्स-रे मशीन केंद्राकडून रवानाच झाला नसल्याचे सांगण्यात आले.विशेष म्हणजे टी़बी़प्रोग्रॅममधील हे डिजिटल एक्स-रे मशीन केवळ छातीच्या एक्स-रेसाठी आहे. हे एक्स-रे मशीन ओ़पी़डी़साठी कामी येणार नाही असेही राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचा हा कारभार म्हणजे ‘आयाजीच्या जिवावर बायजी उदार’ असाच होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यातील एक्स-रे मशीन गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. हे मशीन दुरुस्त करण्यासाठी दहा लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च असल्याने, पालिकेने नवीन मशीन खरेदी करण्याचा पर्याय निवडला.  पण आर्थिक तरतूद नसताना एवढे महाग मशीन घेण्यापेक्षा टी़बी़प्रोग्रॅममधून मिळणाऱ्या मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात दीड वर्ष उलटले व शहरातील गरीब-गरजूंना पैसे खर्च करून एक्स-रे काढण्याची वेळ आली. याबाबत पालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कमला नेहरू रुग्णालयातील एक्स-रे मशीनद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र रुग्णाने दाखविल्यास मोफत एक्स-रे क्रस्रा लॅबोरेटरीकडून दिले जातील, असे सांगितले. याबाबतचे पत्र सदर लॅबोरेटरीला दिले असून, कमला नेहरूसह अन्य दोन ठिकाणी त्यांना पालिकेकडून चालविण्यास देण्यात आलेल्या एक्स-रे मशीनद्वारेही मोफत एक्स-रे यापुढे दिले जातील, असे सांगितले आहे.........पत्र का लावले नाही : विवेक वेलणकर शहरी गरीब योजनेद्वारे शहरातील हजारो गरिबांना खासगी हॉस्पिटलमध्ये एक लाखापर्यंत उपचार देणारा आरोग्य विभाग एक्स-रे मशीन सेवेबाबत गेल्या दीड वर्षापासून उदासीन का आहे. हे मशीन बंद पडल्यावर क्रस्रा लॅबोरेटरीला मोफत एक्स-रेसाठी पत्र दिले होते, तर तशी जाहीर सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीखाना येथे का लावली नाही? असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. ............बंद पडलेल्या एक्स-रे मशीनचा दुरुस्ती खर्च जास्त असल्याने, नवीन मशीन घेण्याऐवजी टी़ बी़ प्रोग्रॅमअंतर्गत मिळणाऱ्या एक्स-रे मशीनचा वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. येत्या आठ-दहा दिवसांत हे मशीन कार्यान्वित होऊन गरीब रुग्णांना मोफत एक्स-रे प्राप्त होतील - डॉ. रामचंद्र हंकारे़, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारMayorमहापौरcommissionerआयुक्त