शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपत्ती काळात ‘सॅनिटायझर’ खरेदीत पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याची ‘खाबुगिरी’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 13:41 IST

बाजारात उपलब्ध असलेल्या किंमतीपेक्षा तीन पटीने अधिक दराने केली खरेदी 

ठळक मुद्देआरोग्य खात्याकडून होणाऱ्या खरेदींचे ऑडिट व्हावे अव्वाच्या सव्वा किंमती देऊन होणारी खरेदी म्हणजे पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय

 निलेश राऊत -पुणे : कोरोना आपत्ती काळात एकीकडे डॉक्टर्स, नर्ससह अन्य वैद्यकीय सहाय्यक सेवक वर्ग अहोरात्र काम करीत असतानाच, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा किंमती देऊन वैद्यकीय सामुग्रीची खरेदी केली जात आहे. याचा उत्तम नमुना नुकताच उघकीस आला असून, बाजारात 'सहाशे ते सातशे' रूपयांपर्यंत उपलब्ध असणारे '५ लिटरचे सॅनिटायझरचे कॅन' पालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल तीन पट अधिक दर देऊन खरे केली जात आहे. याचा उत्तम नमुना नुकताच उघकीस आला असून, बाजारात 'सहाशे ते सातशे' रूपयांपर्यंत उपलब्ध असणारे '५ लिटरचे सॅनिटायझरचे कॅन' पालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल तीन पट अधिक दर देऊन खरेदी केले आहे.         

कोरोनाची चाहुल लागल्यापासून पुणे महापालिकेची यंत्रणा शहरात कामाला लागली़ मार्च महिन्यापासून दिवसामागे कोरोना रूग्ण वाढू लागले. अशावेळी रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, वैद्यकीय साधनांची कुठलीही कमतरता भासू नये यासाठी आरोग्य विभागाच्या भांडार विभागाकडून 'विना टेंडर' थेट साहित्य खरेदी सुरू झाली. यास प्रशासनाकडून खेरदी पश्चात एकगठ्ठा मान्यता स्थायी समितीकडून आजही घेण्यात येत आहे.            

परंतु, या खरेदी सध्या वादाच्या भोवºयात सापडल्या असून, याची प्रचिती आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या 'सॅनिटायझर'मध्ये दिसून आली आहे. सद्यस्थितीला अनेक कंपन्यांचे तसेच साखर कारखान्यंनी तयार केलेले चांगल्या प्रतीचे तसेच शासकीय निकषानुसार अल्कोहोल युक्त सॅनिटायझर बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत होलसेलमध्ये ५ लिटरच्या कॅनकरिता साधारणत: सहाशे ते सातशे रुपए (उत्तम प्रतीच्या) इतकी आहे, असे असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भांडार विभागाकडून १ हजार ७०० रूपयांपेक्षा अधिक किंमत अदा करून पाच लिटर सॅनिटायझरचे कॅन खरेदी करण्यात आले आहेत.

 ही खरेदी करताना कारण देखील अजब देण्यात आले असून, बाजारात पाच लिटर सॅनिटायझरचे कॅनची किंमत, 'एमआरपी' ही २ हजार ५०० रुपए आहे. पण पुणे महापालिकेने यात तब्बल २८़५० टक्के सवलत घेऊन सॅनिटायझरची खरेदी केली असल्याचे सांगून, महापालिकेने कशी कमी किंमतीत खरेदी केली याचा डंका पिटला जात आहे. वस्तुत: बाजारात उपलब्ध असलेल्या कॅनवरील एमआरपी व प्रत्यक्ष विक्रीचा दर हा विक्रेत्याला तसेच सर्व सामान्य खरेदीदारास ही ठाऊक आहे. असे असताना २८़५० टक्के सवलतीलचा दावा किती हास्यास्पद आहे याची चर्चाच सध्या पालिकेच्या वतुर्ळात सुरू आहे.    

कोरोना आपत्तीशी लढताना, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाला, हॉस्पिटलला, रूग्णांना कुठलीही कमतरता पडू नये़ याकरिता स्थायी समितीच्या परवानगीशिवाय वैद्यकीय संबंधित गोष्टींची थेट खरेदी करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. यामध्ये पीपीई किट, मास्क, हॅण्डग्लोज, औषधे, हॉस्पिटल उपकरणे, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर, सॅनिटायझर आदी निगडीत गोंष्टीचा समावेश आहे.  

 वरील सर्व खरेदी सद्यस्थितीला विना टेंडर केली जात असून, यांच्या खरेदीपश्चात स्थायी समितीकडून ऐनवेळी विषय आणून त्यास मान्यता दिली जात आहे. त्यामुळे कोरोना आपत्तीतील विना टेंडर खरेदी करता देण्यात आलेली ही सुट खाबुगिरीला खतपाणी देणारी ठरली असून, कोरोना आपत्ती काळात खरेदी झालेल्या सर्व वस्तूंची चौकशी व्हावी अशी मागणी आता पुढ येऊ लागली आहे. -------------------- 

आरोग्य खात्याकडून होणाऱ्या खरेदींचे ऑडिट व्हावे पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सध्या पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर व इतर वैद्यकीय उपकरणांची व तत्सम गोष्टींची विना टेंडर खरेदी केली जात आहे. मात्र बाजार भावापेक्षा दुप्पट तिप्पट किंमत देऊन हे व्यवहार होत असून, कोरोना आपत्ती काळात झालेल्या या सर्व व्यवहारांचे डिट करावे. तसेच या खरेदीसाठी दिलेल्या किंमती व बाजारातील किंमती याची त्रयस्त संस्थेमार्फत चौकशी करून, संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी़ अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. ------------------- 

पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय थांबवावा - प्रदीप देशमुखसॅनिटायझरचे अनेक उत्पादक कारखाने पुणे शहर परिसरात जिल्ह्यात असून, पुणे   महापालिका एका मध्यस्थामार्फत सॅनिटायझरची खरेदी करीत आहे. पुणे महापालिकेने ३४ रुपए प्रति १०० मि़ली़ म्हणजेच ३४० रुपए प्रती लिटर व १ हजार ७०० रुपये दर देऊन (५ लिटरचे सॅनिटायझर कॅन) ५ लिटर सॅनिटायझर खरेदी केले आहे. अशा रितीने कोरोना आपत्तीच्या काळात अव्वाच्या सव्वा किंमती देऊन, आरोग्य खात्याकडून होणारी खरेदी म्हणजे पुणेकरांच्या करूरूपाने दिलेल्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली असून, याकरिता योग्य ते आदेश महापालिकेला देण्याबाबत विनंती केली आहे.--------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटल