शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील ७५ कंत्राटीवाहनचालकांचे आंदोलन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 21:10 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तेरा तालुक्यात ७५ कंत्राटी वाहनचालक खासगी ठेकेदाराच्या मार्फत नेमले आहेत. मात्र ठेकेदार चार-चार महिने पगार करत नसल्याने या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देमानधन रखडलेले : ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सूरज मांढरे यांचा इशाराआरोग्य सेवेसारख्या महत्वाच्या सेवेमध्ये बाधा आणून नागरिकांचे जीविताला धोका

पुणे : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी वाहनचालकांचे मागील पाच महिन्यांतील मानधन संबंधित ठेकेदाराच्या खात्यावर जिल्हा परिषदेने जमा केले आहे. या ठेकेदाराने ७५ कंत्राटी वाहनचालकांचे सर्व मानधन त्वरित त्यांना अदा करावे. अन्यथा या ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, असे पत्र काढले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तेरा तालुक्यात ७५ कंत्राटी वाहनचालक खासगी ठेकेदाराच्या मार्फत नेमले आहेत. या ठेकेदाराला राज्य शासनाच्या वतीने निधी दिला जातो. मात्र हा निधी येण्यास थोडाफार उशिर होतो. त्यामुळे जिल्हा परिषद आणि संबंधित ठेकेदार यांच्या मध्ये नियम आणि आटींचा करार झाला आहे. त्यामुळे या ७५ कंत्राटी चालकांना दर महिन्याचा पगार वेळेत देणे संबंधित ठेकेदाराला बंधनकारक आहे. मात्र ठेकेदार चार-चार महिने पगार करत नसल्याने या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोव्हेंबर २०१७ पासून मार्च २०१८ पर्यंत पाच महिने या कर्मचाऱ्यांना या ठेकेदाराने पगार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या वाहनचालकांनी मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. कोटतत्काळ दखल घेऊन काम बंद आंदोलन मागे घेतले गेले नाही, तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा. आरोग्य सेवेसारख्या महत्वाच्या सेवेमध्ये बाधा आणून नागरिकांचे जीविताला धोका निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करावे, तसेच २० एप्रिल पर्यंत संबंधित ठेकेदाराने सर्व कंत्राटी वाहनचालकांचा पगार द्यावा. तसेच याविषयी खुलासा करावा. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, असा स्पष्ट आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांना दिला आहे. त्याचा चांगला परिणाम झाला असून, स्वत:हूनच ठेकेदार कंपनीने बुधवारी संध्याकाळी माघार घेत आंदोलन मागे घेतले. - सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य