शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 19:52 IST

डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती महापालिका वर्तुळात मोठी चर्चिली जात होती..

पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य प्रमुखपदी बुधवारी डॉ. आशिष हिरालाल भारती यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी राज्य शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.     पालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून काम पाहणारे विद्यमान आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांचा २५ सप्टेंबर, २०२० रोजी प्रतिनियुक्तीची कालावधी समाप्त झाला होता. त्यातच डॉ. हंकारे यांनीही महापालिकेच्या सेवेत न थांबण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांनी आपली येथून लवकरात लवकर बदली व्हावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. आज अखेर डॉ. हंकारे यांची पुण्यातील आरोग्य सेवा विभागात (कुटुंब कल्याण) येथे सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, या आदेशात डॉ. हंकारे यांची नियुक्ती पुन्हा मुळ संवर्गात करण्यात आली आहे.     डॉ. हंकारे यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती महापालिका वर्तुळात दुपारीच मोठी चर्चिली जात होती. त्याचवेळी आता नवीन आरोग्य प्रमुख कोण यावर मोठी खमंग चर्चाही रंगली गेली. काहींनी प्रभारी आरोग्य प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. अंजली साबणे यांच्याकडेच काही दिवस हा पदभार राहील. तर, काहींनी डॉ. हंकारे यांना आपत्तीच्या काळात महापालिका कार्यमुक्त करणार का अशीची चर्चा रंगवली. मात्र डॉ़ हंकारे यांच्या बदलीच्या आदेशापाठोपाठ सायंकाळीच डॉ़आशिष भारती यांची नियुक्ती महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी प्रतिनियुक्तीने एक वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात येत असल्याचे आदेश मंत्रालयातून आले़.परिणामी पुन्हा एकदा महापालिकेला प्रतिनियुक्तीवरच आरोग्य प्रमुख मिळाला आहे.     डॉ. भारती हे आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण) पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून गेली सहा वर्षे कार्यरत होते. ३० सप्टेंबर,२०२० पासून त्यांची पुढील एक वर्षाकरिता पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी प्रतिनियुक्तीवर नेमणुक करण्यात आली आहे.    ------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य