मुख्याध्यापक संघाने गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील राहावे : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:42+5:302021-07-14T04:14:42+5:30

बावडा येथे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड ...

Headmasters team should strive for quality improvement: Harshvardhan Patil | मुख्याध्यापक संघाने गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील राहावे : हर्षवर्धन पाटील

मुख्याध्यापक संघाने गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील राहावे : हर्षवर्धन पाटील

बावडा येथे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य जी. एस. घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य जी. एस. घोरपडे हे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरवली येथील कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीचे आव्हान आगामी काळात मुख्याध्यापक व शिक्षकांवरती असणार आहे. सदर आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आतापासूनच मुख्याध्यापक संघाने करावी, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सरपंच व सचिव किरण पाटील, प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुका मुख्याध्यापक संघाचे नूतन अध्यक्ष जी. एस. घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Headmasters team should strive for quality improvement: Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.