शाळेच्या विकासकामांसाठी मुख्याध्यापकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:46+5:302021-02-21T04:20:46+5:30
वालचंदनगर: इंदापूर तालुक्यातील रणगाव विद्यालयातील मुख्याध्यापकाने कोरोनाच्या काळातील १० महिन्यांचा पगार शाळेच्या विकासकामासाठी देऊन जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण ...

शाळेच्या विकासकामांसाठी मुख्याध्यापकाने
वालचंदनगर: इंदापूर तालुक्यातील रणगाव विद्यालयातील मुख्याध्यापकाने कोरोनाच्या काळातील १० महिन्यांचा पगार शाळेच्या विकासकामासाठी देऊन जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थी हितासाठी शिक्षकांनी एकसंघ राहून काम केल्यास एक आदर्श शाळा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. इंद्राणी फाऊंडेशन या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून मिळालेले २८ सायकलींचे योगदान विद्यार्थी कदापि विसरणार नाहीत असे मत राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
रणगाव हायस्कूलमधील सायकल वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश निडबने,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम,उपाध्यक्ष मधुकर डोंबाळे पाटील,आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भारत रणमोडे, उपाध्यक्ष दिलीप पवार उपस्थित होते.
यावेळी भरणे म्हणाले की, तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच तालुक्याचा विकास अवलंबून आहे. रणगांव हायस्कूल रणगांव या विद्यालयासाठी वाल कंपाऊंडसाठी १० लाख , वाटर फिल्टर व फेवर ब्लाँकसाठी ५ लाख मंजूर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. सायकल वाटपावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्याने विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण ग्राऊंडला सायकलवर बसून राऊंड मारल्याने विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.