शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:29 IST

गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर  कमळ फुलवले आहे.

ठळक मुद्देशहरातील सर्व राजकीय पक्षांचे फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरुभाजपाच्या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात पक्षाची जाहिरात करत भिंतीवर सर्वत्र कमळ फुलवली  दोन दिवसांत ५ हजार ८०८ बॅनर, फ्लेक्स, झेंडे काढले

पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व राजकीय पक्षांचे फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर  कमळ फुलवले आहे. परंतु आता आचासंहितेमुळे भाजपचे चिन्ह कमळ झाकणे व रंगवणे प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरणार आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८-१९ अंतर्गत शहरामध्ये सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व उड्डाणपुल, शाळा, रुग्णालय,रस्ते आदी विविध ठिकाणी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु या भिंती रंगविताना सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात पक्षाची जाहिरात करत भिंतीवर सर्वत्र कमळ फुलवली आहेत. या भिंती रंगविण्यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत विरोधकांनी भाजपवर टिका देखील केली आहे. तसचे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल देखील नुकताच लागला असून, यामध्ये महापालिकेच्या स्वच्छतेचा दर्जा चांगला घसरला आहे.  याला देखील सत्ताधारी भाजपने शहरातील भिंतींवर काढलेले कमळ कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.    परंतु आता आचारसंहित जाहीर झाली असून, महापालिका प्रशासनाला या भिंतींवर रंगवलेली कमळांची फुले रंग देऊन पुसून टाकावी लागणार आहे. यासाठी प्रशासनाला किमान आठ-दहा दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. ----------------- दोन दिवसांत ५ हजार ८०८ बॅनर, फ्लेक्स, झेंडे काढलेलोकसभा निवडणुकीसाठी १० मार्च रोजी सायंकाळ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. शहरामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोन दिवसांपासून शहरातील बॅनर, फ्लेक्स, झेंड काढण्याची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये आता पर्यंत ५ हजार ८०८ बॅनर, फ्लेक्स, झेंडे काढण्यात आले आहेत.   

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणcollectorजिल्हाधिकारीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक