शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:39 IST

आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे.

ठळक मुद्देसहकारी कारखान्यात सामान्य माणसांना सभासद करून दाखवा  

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विरोधक वीस-पंचवीस वर्षे मंत्री पदावर होते त्यांनी का नवे रस्ते का केले नाहीत? का शेतीचा पाणी प्रश्न सोडवला नाही ? आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे. तुम्हाला तालुक्याच्या जनतेने आता घरी बसवले आहे. तुम्ही आमच्या कामाची चिंता करू नका. दिशाभूल करून तालुक्यातील जनतेला जातीपातीचे राजकारण करण्यासाठी भाग पाडू नका,  असा हल्लाबोल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.  

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याची पाणी पातळी वाढविणे. याकरिता १ कोटी ७३ लक्ष निधी जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाची सुरुवात बुधवार ( दि.१७ ) रोजी राजेंद्र तांबिले, संजय पाटील, भीमा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता ध. जी. कोंडेकर उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले, राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे आहे.हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे आहे.सरकार म्हणजे नोटा छापण्याचा कारखाना नाही.आपण जे कर रुपी शासनाकडे निधी जमा करतो.तोच निधी विकास कामांना वापरता येतो यावर सरकार चालते हे लक्षात राहू द्या. त्यामुळे वीज बिल आपण भरणे गरजेचे आहे.व शेतकऱ्यांची वीज देखील अबाधित राहिली पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली._____________विरोधकांच्या पोटात पोटशूळ....इंदापूर तालुक्यात कोणतीही निवडणूक आली की जातीपातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतात. परंतु मी कधीही जातिवाद केला नाही,  करणारही नाही. सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी मी विकासासाठी आणलेला निधी विरोधकांना देखवत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली....... 

सहकारी साखर कारखाने म्हणता मग सभासद करून का घेत नाही ?इंदापूर तालुक्यातील निरा - भिमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात आहे. सहकारी साखर कारखाने म्हणून मिरवतात. मात्र कोणालाही सभासद करून घेत नाही. नीरा-भीमा व कर्मयोगी साखर कारखान्यांमध्ये खुल्या पद्धतीने सभासदांना घेऊन दाखवा, असे आव्हान राज्यमंत्री भरणे यांनी विरोधकांना केले आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकारministerमंत्री