देहूत लाच घेताना अभियंत्याला पकडले

By Admin | Updated: October 13, 2015 01:06 IST2015-10-13T01:06:30+5:302015-10-13T01:06:30+5:30

येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला पुणे विभाग लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले.

He took the bribe of the engine and caught the engineer | देहूत लाच घेताना अभियंत्याला पकडले

देहूत लाच घेताना अभियंत्याला पकडले

देहूगाव : येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला पुणे विभाग लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश साहेबराव केदार (वय ३०, रा. त्रिवेणीनगर, तळवडे, ता. हवेली, पुणे) असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ सुरूअसलेल्या नवीन बांधकामासाठी तक्रारदाराने येथील महावितरणच्या कार्यलयात मीटर मिळावा म्हणून रीतसर कोटेशन भरून अर्ज केला होता.
मात्र केदार यांनी हे मीटर देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने एवढे पैसे नसल्याचे सांगत तडजोड रक्कम म्हणून २० हजार रुपयांची रक्कम निश्चित केली.
तक्रारदाराने दोन दिवसांपूर्वी तडजोड रकमेपैकी पाच हजार
रुपये दिले. सोमवारी सकाळी
केदार यांनी तक्रारदाराकडे फोन
करून उर्वरित रकमेची मागणी केली. सरकारी कार्यालयात कोणत्याही कर्मचाऱ्याने अशा पद्धतीने लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. (वार्ताहर)

Web Title: He took the bribe of the engine and caught the engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.