चाकूने वार करून डिलिव्हरी बॉयला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST2021-07-07T04:11:54+5:302021-07-07T04:11:54+5:30

पुणे : घरपोच अन्नपदार्थ पोहचविणा-या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला तिघांनी भररस्त्यात अडवून चाकूने वार करत त्याला लुबाडल्याचा प्रकार लोहगाव परिसरातील ...

He stabbed the delivery boy with a knife | चाकूने वार करून डिलिव्हरी बॉयला लुबाडले

चाकूने वार करून डिलिव्हरी बॉयला लुबाडले

पुणे : घरपोच अन्नपदार्थ पोहचविणा-या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला तिघांनी भररस्त्यात अडवून चाकूने वार करत त्याला लुबाडल्याचा प्रकार लोहगाव परिसरातील फॉरेस्ट पार्क येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याप्रकरणी कमलेश पांडे (वय ३२, रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पांडे हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शनिवारी रात्री त्यांना लोहगावच्या एअरपोर्ट परिसरात एक आॅर्डर आली होती. ती आॅर्डर देऊन ते फॉरेस्ट पार्क रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना एअर फोर्सच्या भिंतीजवळ अडविले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे काढण्यास सांगितले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर चोरट्याने त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांची दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेऊन नगर रोडच्या दिशेने ते पळून गेले. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: He stabbed the delivery boy with a knife