शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | व्हॉटसअपवरील चॅट वडिलांना दाखवण्याची धमकी देत अडीच लाखांना लुटले

By विवेक भुसे | Updated: April 15, 2023 11:33 IST

वडिलांचा मुला मुलींशी बोलण्यास विरोधाचा परिणाम...

पुणे : आपल्या मुलाने कोणा मुलींशी बोललेले देखील त्यांना आवडत नव्हते. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हा प्रकार आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या महाविद्यालयीन मुलाला एका मित्राने तुझ्याबरोबर व्हॉटसअपवर झालेले चॅट आईवडिलांना दाखवितो, अशी धमकी देऊन तब्बल अडीच लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एरंडवणा येथे राहणार्‍या एका ४८ वर्षाच्या व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रितेश सोंडकर नावाचा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचा मार्केटयार्डमध्ये व्यवसाय आहे. त्यांना मार्च महिन्यात वार्षिक टॅक्स भरावयाचा असल्याने त्यांनी स्वत:चे व कुटुंबियांचे खात्यात झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्यात त्यांच्या महाविद्यालयीन मुलाच्या खात्यातून गुगल पे द्वारे १ लाख ५२ हजार रुपये व प्रत्येकी २५ हजार असे चार वेगवेगळ्या क्रमांकावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाला विचारले. त्याने जे सांगितले, त्यामुळे आपल्या अवास्तव बंधनामुळे मुलगा किती भितीखाली वागत होता, हे समजून आले. त्यापोटी त्याने कोणाला न सांगता तब्बल अडीच लाख रुपये घाबरुन दिल्याचे उघड झाले. 

फिर्यादी यांच्या मुलाला ऑक्टोबरमध्ये प्रितेश सोंडकर नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती स्वीकारल्यावर त्याला स्रेहल गुरव नावाने मेसेज येऊ लागले. त्याने प्रितेश सोंडकर नावाची फेसबुकवरील रिक्वेस्ट माझीच असून मी तुझा व्हॉटसअ‍ॅप नंबर त्यावरुनच घेतला असून आपण मित्र म्हणून बोलू असे त्याने सांगितले. व्हॉटसअ‍ॅपवर चॅट सुरु झाल्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाने त्याला भेटण्याविषयी विचारले. तेव्हा त्याने मी फुकट भेटत नाही, त्यासाठी १ हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले. मुलाने १ हजार रुपये पाठवले. त्यानंतर त्याने आतापर्यंत केलेले चॅट तुझ्या आईवडिल व फेसबुक फ्रेंडना पाठवतो, असे म्हणून धमकावु लागला. पैशांची मागणी करु लागला.

आपल्या वडिलांना मित्र वगैरे आवडत नसल्याचे मुलाला माहिती असल्याने त्याने भीतीपोटी घरी कळू नये, म्हणून तो मुलगा सांगेल, तसे पैसे देत गेला. त्याने एकूण १ लाख ५२ हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी त्याला पुन्हा मेसेज आला. आता शेवटचे १ लाख रुपये दे. मी पुन्हा तुला त्रास देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या भाचाच्या दुकानात काम करणार्‍या चौघांच्या नावावर प्रत्येकी २५ हजार रुपये पाठविले. ते पैसे त्याने सांगितलेल्या नंबरवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी मुलाच्या मोबाईलवरील तो नंबर बंद केला. त्यानंतर त्याने दुकानातील लोकांना त्याला पैसे पाठविण्यास सांगितले होते, त्यांना मेसेज येऊ लागले. फिर्यादीच्या मुलाला मला फोन करायला सांगा नाही तर त्याचे वडिलांना फोन करेल, असे सांगून धमकावत आहे़.डेक्कन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप