शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एका झाडासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरणातच मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 19:02 IST

रस्त्यावरील झाडाचा त्रास हाेत असल्याने ते छाटून देण्याची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाने थेट महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात ठिय्या मांडला.

पुणे :  सातत्याने अर्ज करुनही इमारतीसमाेरील पदपथावरील झाड न काढल्याने व्यावसायिकाने शनिवारी थेट पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातच ठिय्या मांडला. विक्रम खन्ना असे या व्यावसायिकाचे नाव असून जाेपर्यंत कर्मचारी इमारतीसमाेरील झाड काढत नाहीत, ताेपर्यंत प्राधिकरणातून हलणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला हाेता, अखेर पालिकेने फांद्या छाटण्याचे लेखी अाश्वासन दिल्यानंतर त्यांनी अापले अांदाेलन मागे घेतले. 

    विक्रम खन्ना यांची लक्ष्मी रस्त्यावर इमारत अाहे. या इमारतीच्या समाेर एक उंबराचे झाड अाहे. ते झाड काढावे असा अर्ज त्यांनी 3 जानेवारी 2018 राेजी पालिकेकडे केला हाेता. झाड काढणे शक्य नसेल तर इमारतीला अडथळा ठरणाऱ्या फांद्यातरी छाटून द्याव्यात अशी त्यांची मागणी हाेती. परंतु महापालिकेने झाड काढण्याबाबत कुठलिही कारवाई केली नसल्याचे किंवा त्यांच्या अर्जाबाबत कुठलाही निर्णय कळवला नसल्याचे खन्ना यांचे म्हणणे अाहे. त्या एका झाडाच्या बदल्यात इतर ठिकाणी झाडे लावण्याची त्यांनी तयारी दर्शवली अाहे. परंतु त्यांच्या अर्जावर पालिकेचे अधिकारी टाेलवाटाेलवी करत असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. झाड पाडणे शक्य नसल्यास त्याच्या फांद्यातरी छाटून देण्यात द्याव्यात अशी त्यांची मागणी अाहे. त्याचबराेबर सात महिन्यापूर्वी केलेल्या अर्जावर काय कारवाई झाली याची माहिती मिळावी यासाठी त्यांनी शनिवारी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणात थेट ठिय्याच मांडला. 

    याबाबत बाेलताना खन्ना म्हणाले, सात महिन्यापूर्वी मी झाड काढण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यावर काय कारवाई केली याचे उत्तर मला पालिकेने दिले नाही. त्यानंतरही अनेक अर्ज करुनही कुठलेही ठाेस उत्तर देण्यात अाले नाही. नेहमी टाेलवाटाेलवीची उत्तरे देण्यात अाली. झाड कापणे शक्य नसेल तर फांद्या छाटून द्याव्यात अशी मी मागणी केली. परंतु पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत अाहे. तसेच खासगी व्यक्तीकडून फांद्या कापण्यास सांगण्यात येत अाहे. वास्तविक ते झाड पालिकेच्या मालकीचे असून त्याच्या फांद्या छाटून देणे ही पालिकेची जबाबदारी अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या