शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला 'तो' प्रवासी पॉझिटिव्ह; कालच केली होती RTPCR चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:06 IST

ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी 'जीनोम सिक्वेन्सिंग' करावे लागणार

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. त्याला घरीच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काल त्याची आरटीपीसीआर चाचणी महापालिकेने केली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी 'जीनोम सिक्वेन्सिंग' करावे लागणार असल्याची माहिती  आरोग्य विभागाने दिली आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील कोव्हीड विषाणूच्या उत्परीवर्तीत प्रकाराचा ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन, महापालिकेने परदेशातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल या देशातून कोण नागरीक आले आहेत का, याची माहिती सध्या महापालिका गोळा करत आहे. 

जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेनेही शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले असून, विमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे. यात एक नागरीक वीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आला असून, त्याचा शोध लागला आहे़ त्यामुळे त्याला त्याचा तपासणी अहवाल येइपर्यंत पुढील आठ ते दहा दिवस घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ज्या देशांमध्ये हा विषाणू आढळून आला त्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही

दरम्यान ज्या देशांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे, त्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या भारतातील शहरातुन पुण्यात आलेल्यांची माहीतीही गोळा केली जात आहे. शहरात गेल्या आठवड्यात दैनंदिन रूग्ण संख्या शंभरच्या आत असली तरी पूर्वीपेक्षा ती वाढलेली आहे. तसेच तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी (शंभरापैकी एकूण रूग्ण) दीड टक्क्यांवरून पुन्हा अडीच टक्क्यांपर्यंत गेली आहे. मात्र ही वाढ हा संसर्गातील चढउतार असतोच त्यामुळे लागलीच शहरात कोरोना संसर्ग वाढला आहे असे म्हणता येणार नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेOmicron Variantओमायक्रॉनPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या