शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

MPSC परिक्षेतील अपयशानंतर 'तो' माघारी गेलाच नाही; १२ वर्षांनी भेट, आई-वडिलांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 19:56 IST

पोलीस अधिकारी महेश बोळकोटगी यांनी या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्याची आई वडिलांशी भेट करून दिली...

- किरण शिंदे

पुणे : घरची परिस्थिती बेताची, आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. अशात मुलाला स्पर्धा परीक्षेचे वेड लागलं. आई वडिलांचा मात्र त्याच्या पुण्याला जाण्यासाठी विरोध. अशा परिस्थितीत बारा वर्षांपूर्वी कुणालाच काही न सांगता त्याने घर सोडले. पुण्यात भाड्याने खोली घेतली. अर्धवेळ नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. मात्र त्यातही सतत अपयश आल्याने हा तरुण राहत घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी बेपत्ता झालेल्या या तरुणाला शोधून काढले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर हा ही संपूर्ण घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलीस अधिकारी महेश बोळकोटगी यांनी या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्याची आई वडिलांशी भेट करून दिली. 

संतोष कमलाकर पैठणे (वय ३८, मु.पो. काटोदा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या गावातच तो लहान मुलांचे क्लास घ्यायचा. त्याला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी व्हायचे होते. मात्र घरची परिस्थिती बिकट असल्याने शक्य नव्हते. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याला पुणे शहरात जाण्यास विरोध केला होता. दरम्यान आई-वडिलांचा विरोध असतानाही तो २०१२ मध्ये कुणाला काही न सांगता घरातून निघून गेला. पुण्यात आला, पार्ट टाइम नोकरी करून त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मधल्या काळात त्यांनी एमपीएससीच्या अनेक परीक्षा दिल्या. मात्र या परीक्षांमध्ये त्याला अपयश आले. या काळात तो मुंढवा परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. 

दरम्यान सतत अपयश येत असल्याने निराश झालेला संतोष १५ ऑक्टोबर रोजी मुंढवा येथील घरातून निघून गेला होता. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मिसिंग तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी मिसिंग तक्रारीची नोंद घेऊन तपास केला आणि संतोष पैठणे याला शोधून काढले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने बारा वर्षांपूर्वी घर सोडल्याचे सांगितले. संपूर्ण घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी या मुलाच्या राहत्या गावी सरपंचाशी संपर्क साधला. त्याच्या आईवडिलांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. त्यांना पुण्यात बोलावून घेतले आणि बारा वर्षापासून गायब असलेल्या मुलाला त्यांनी कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवले. बारा वर्षापासून कोणताही संपर्क नसलेला मुलगा पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात मात्र आनंदाचे अश्रू तराळले. मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेने दुरावलेल्या मुलगा आणि आई-वडिलांची भेट झाली. 

ही कामगिरी पोलीस उपायुक्त आर राजा, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस कर्मचारी महेश पाठक दत्ता जाधव दिनेश भांदुर्गे योगेश गायकवाड हेमंत पेरणे यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMPSC examएमपीएससी परीक्षा