‘त्या’ डॉक्टरला केले बडतर्फ
By Admin | Updated: January 10, 2017 03:24 IST2017-01-10T03:24:25+5:302017-01-10T03:24:25+5:30
येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या भोसरीतील एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीला निवासी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता

‘त्या’ डॉक्टरला केले बडतर्फ
पिंपरी : येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या भोसरीतील एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीला निवासी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकारणी रुग्णालय प्रशासनाने शिल्पा रावडे या निवासी डॉक्टरला सेवेतून बडतर्फ केले.
अरुंधती रमेश ढाकणे (वय ९ महिने) हिची गुरुवारी प्रकृती खालावल्याने रग्णालयात उपचारांसाठी आणले होते. मात्र, शिल्पा रावडे यांनी सदर मुलीची प्रकृती उत्तम असल्याचे सांगून त्यांना घरी पाठविले. यानंतर काही तासांनी अरुंधतीचा मृत्यू झाला. संबंधित डॉक्टरने उपचारांमध्ये केलेल्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप रमेश ढाकणे यांनी केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने शिल्पा रावडे यांना शुक्रवारी नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने रावडे यांना बडतर्फ करण्यात आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी सांगितले. रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)