१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करून केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:10 IST2021-04-09T04:10:21+5:302021-04-09T04:10:21+5:30

पुणे : अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही १६ वर्षांच्या मुलीसमवेत लग्न करून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला ...

He committed atrocities by marrying a 16-year-old girl | १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करून केला अत्याचार

१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करून केला अत्याचार

पुणे : अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही १६ वर्षांच्या मुलीसमवेत लग्न करून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नागेश दशरथ लांडगे (वय २५, रा. साठेनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत पीडिताच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घडला. याप्रकरणी सहायक फौजदार मुनीर अब्बाज इनामदार यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नागेश लांडगे याने एका १६ वर्षांच्या युवतीबरोबर लग्नापूर्वी तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याबरोबर लग्न केले. तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केले. गर्भपात करण्याचा प्रयत्न करत होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. वानवडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: He committed atrocities by marrying a 16-year-old girl