लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती: भरदिवसा दुपारी तीन वाजता घरात घुसून लूट केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील भालेराव गॅरेजच्या मालकाच्या पत्नी आणि सुनेच्या गळ्याला चाकू लावून साडेसहा लाखांची रोकड आणि दीड लाखाचे दागिनेसह आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
फलटण रस्त्यावरील भालेराव गॅरेजचे मालक भाऊसाहेब नामदेव भालेराव यांच्या राहत्या घरामध्ये दोन चोरटे इसम घुसले. या दोघांनी घरात घुसून भाऊसाहेब नामदेव भालेराव यांच्या पत्नी प्रमिला तसेच सून काजल आशितोष भालेराव यांच्या गळ्याला चाकू लावला. तसेच ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. या चोरट्यांनी अंगात पिवळ्या कलरचा शर्ट आणि आणि काळी पॅन्ट आणि दुसऱ्या इसमाच्या अंगात निळा शर्ट व स्किन कलरची पॅन्ट आहे.