शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! त्यांनी टाळला लग्नाचा थाट; शाळेच्या बांधकामासाठी दिले पाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:54 IST

भास्कर गाडगे यांचा आदर्श उपक्रम; अनाथ आश्रमास एक लाखांचा दिला निधी

निमगाव सावा : एकीकडे राजकारणी नेतेमंडळींनी त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचे काम ऐन दुष्काळात सुरूच ठेवले असताना दुसरीकडे उद्योगपती भास्करगाडगे यांनी लग्नाचा थाट टाळून गोरगरिबांची मुले ज्या शाळेत शिकतात, अशा पंडित नेहरू विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे पाच लाख रुपये व सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमास सुमारे एक लाख रुपयांचा धनादेश दिला.निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती भास्कर गाडगे यांनी हा आदर्श समाजासमोर मांडला आहे. त्यांचा मुलगा आशुतोष यांचा विवाह नुकताच पार पडला. लग्नातील महत्त्वाचे विधी आणि हौस त्यांनी केलेच, मात्र केवळ थाट दिसावा, म्हणून करण्यात येणारा खर्च टाळून तो पैसा त्यांनी अनाथाश्रम आणि शाळेसाठी दिला आहे.निमगाव सावा येथील गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असलेली पंडित नेहरू विद्यालयाच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या होत्या. धोकादायक परिस्थितीत या शाळेत सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष या नात्याने व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून उद्योगपती भास्कर गाडगे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय ग्रामस्थ व पालकांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.मुलीच्या लग्नातही अनाथाश्रमाला निधीभास्कर गाडगे यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमास सुमारे एक लाख रुपयांचा निधी दिला होता. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आपल्या उत्पन्नातील काही वाटा गोरगरीब, अनाथ, गरजू व गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नSchoolशाळा