शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश; २ कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 11:34 IST

याप्रकरणी, पोलिसांनी आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

पुणेः शिवाजी रस्त्यालगतच्या दोन इमारतीवर छापा टाकून हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट ४ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.  यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक  रोकड जप्त करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत त्याची मोजणी सुरू होती. यात हवाल्याच्या व्यवहारातील बडे मासे गळाला लागली असल्याची माहिती समजते.     याप्रकरणी, पोलिसांनी आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबात रात्री उशीरापर्यंत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे हे रॅकेट परिमंडळ पोलिस उपायुक्त 1  फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चालवले जात होते.       पोलिस उपायुक्त प्रियंका नरनवरे, युनिट चार चे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल आणि सहाय्यक निरीक्षक अभिजित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. येथील मंत्री किशोर आर्केड व गणेश कृपा बिल्डींग शनिवारपेठ या दोन इमारतीवर छापा टाकून आठ ते नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना माहिती मिळाल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. उपायुक्त नरनवरे यांनी सांगितले की, ही पुणे शहर गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.आम्हाला अशी माहिती मिळाली की, या रॅकेटमागील काही माणसे बेकायदेशीरपणे रोख रकमेचा संग्रह करत होती. ही रोकड ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बेकायदापणे पोहचवत होते. हवाला रॅकेट गुटखाच्या बेकायदेशीर पुरवठादारांशी जोडला गेला होता. आम्ही एकाच वेळी चार कार्यालयांवर छापे टाकले आणि नऊ जणांनाताब्यात घेतले.    दरम्यान, गुटख्याच्या अवैध व्यापारातून रोख रकमेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. हा पैसा पुण्याहून हवाला रॅकेटमार्गे अन्य शहरात हलविण्यात येत होता. रॅकेटची यंत्रणा संपूर्ण शहर आणि जिल्हयात पसरली आहे. रोकड पैशाचा माग कुठून निघाला आहे याची पोलिस चौकशी करीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी बर्‍याच लोकांचा समावेश असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे......

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस