शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

हवेली तालुका रिंगरोडला बाधित शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:14 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या रिंगरोडला हवेली तालुक्यातून पूर्ण विरोध होऊ लागला आहे.

ठळक मुद्देहवेली तालुका रिंगरोड बाधित शेतकरी संघर्ष समिती स्थापना शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करणार

मांजरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या रिंगरोडला हवेली तालुक्यातून पूर्ण विरोध होऊ लागला आहे. रिंगरोड होत असल्याने यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे जाणार आहे. त्यामुळे ते शेतकरी पुर्ण भूमिहीन होणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे? त्यामुळे बाधित शेतकरी एकत्र येऊन रिंगरोडला विरोध करण्यासाठी पीएमआरडीएच्या विरोधात शेतकऱ्यांनी मोट बांधली आहे.    ज्या शेतीमध्ये विविध पिके घेऊन आजपर्यंत जगत आलो व त्याच शेतामधुन शासन रस्ता करणार असेल व  आम्हाला भूमिहीन करणार असेल तर आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करू असे शेतकऱ्यांनी सांगितले. मांजरी खुर्द येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली.त्यात शेतकऱ्यांनी भूमिका मांडली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश घुले व विकास लवांडे यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांनी बोलवले होते. शेतकऱ्यांचे मते जाणून घेतल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. पुढील दिशा पद्धती ठरवायची असे बैठकीत ठरले. यावेळी बाधित शेतकरी दिगंबर उंद्रे, प्रकाश सावंत, शंकर कदम, शिवाजी शेळके, सोपान आव्हाळे, हनुमंत उंद्रे, गोरख बंडलकर, सदाशिव मुरकुटे, अमोल उंद्रे, नवनाथ सावंत, अरूण कदम, नाना मुरकुटे, अविनाश, सावंत तसेच मांजरी, कोलवडी, आव्हाळवाडी परिसरातून काही शेतकरी उपस्थित होते.      सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रिंगरोडच्या भूमिपूजनाचा घाट बांधला आहे. त्याची सुरवात मांजरीतून होणार असल्याचे समजल्यावर बाधित शेतकरी बांधवांनी एकत्र येण्याचे ठरवले. सरकारने आमच्या रोजीरोटीवर बाधा आणत असेल तर ज्या दिवशी भूमिपूजन असेल  त्याच दिवशी काळे झेंडे दाखवून सरकारविरोधात निदर्शने करण्यात येतील असे हवेली तालुका रिंगरोड बाधित शेतकरी संघर्ष समिती बैठकीत सांगण्यात आले. लवकरच हवेली तालुका रिंगरोड बाधित शेतकरी संघर्ष समिती पीएमआरडीएच्या आयुक्तांना भेट देऊन निवेदन देणार आहे. तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनाही निवेदन देणार आहे,असे बैठकीत सांगण्यात आले.बाधीत शेतकऱ्यांना शासनाने समृद्धी महामार्गाप्रमाणे,पुरंदर येथील होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा विविध स्वरूपाचा पाच ते सात निरनिराळ्या मोबदल्याचा प्रस्ताव शासनाने शेतकºयांना लेखी देण्यात यावा.    सुरेश घुले 

........................

केंद्र सरकारने २०१३ सालीकेलेल्या जारी केलेल्ल्या कायद्यानुसारे बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्यावा लागेल.त्याच कायद्याच्या आधारे शेतकऱ्यांनी मागणी केल्यास शासनाला कायद्याच्या चौकटीत राहुन अंमलबजावणी करावी लागेल.                                              विकास लवांडे, चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व

  

टॅग्स :HadapsarहडपसरManjriमांजरीPMRDAपीएमआरडीएFarmerशेतकरी