हवेली तालुक्याचा विक्रम, १४३ पैकी १४० शाळांचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:30+5:302021-07-18T04:08:30+5:30
तालुक्यातील उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय (९९.८० टक्के), लोणी कंद येथील डॉ. बसू विद्याधाम (९९.२३ टक्के) व महंमदवाडी ...

हवेली तालुक्याचा विक्रम, १४३ पैकी १४० शाळांचा निकाल १०० टक्के
तालुक्यातील उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय (९९.८० टक्के), लोणी कंद येथील डॉ. बसू विद्याधाम (९९.२३ टक्के) व महंमदवाडी येथील डॉ. दादा गुजर विद्यालय (९९.६९ टक्के) या तीन शाळा वगळता इतर सर्व १४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने सदर निकाल अंतर्गत मुल्यमापन लक्षात घेऊन जाहीर केला आहे. त्यामध्ये शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या सत्रपरीक्षा, तोंडी तसेच सराव परीक्षा, चाचणी, असायन्मेंट यासमवेत इतर मूल्यमापन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. उत्तीर्ण झालेल्या १३ हजार ६२८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार १८५ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी, ६ हजार ८ जणांनी प्रथम श्रेणी ३ हजार २६३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. तर १७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.