सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

By Admin | Updated: September 8, 2014 04:12 IST2014-09-08T04:12:36+5:302014-09-08T04:12:36+5:30

अवघ्या दहा दिवसांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रताप अशोक भोसले यांचा ‘प्रताप’ उघडकीस आला आहे

Havalar Gajaad with Assistant Police Inspector | सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

वडगाव निंबाळकर : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रताप अशोक भोसले यांचा ‘प्रताप’ उघडकीस आला आहे. भोसले यांच्यासह पोलीस हवालदार मुश्ताक शेख यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
येथील पोलीस ठाण्यात अवघ्या दहा दिवसांपूर्वी भोसले हे रुजू झाले होते. पणदरे (ता. बारामती) येथील खुनी हल्ला प्रकरणी ४ आरोपी अटकेत आहेत. त्यांना जामीन मिळण्यासंदर्भात,जामीन अर्जावर सरकारतर्फे मदत, असे उत्तर देण्यासाठी आरोपींच्या नातेवाइकांकडे भोसले व शेख यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे नातेवाइकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत तांदळे,चंद्रकांत ठाकूर,पोलीस हवालदार दशरथ चिंचकर, दीपक टिळेकर, महेश झगडे, विजय माळी यांच्या पथकाने शनिवारी (दि. ६) रात्री १०.३०च्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सापळा रचला. यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार सुरेश रोकडे यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडील ६० हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदार शेख यांना रंगेहाथ पकडले. प्रताप भोसले यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे हवालदार शेख यांनी सांगितले.
पदाचा दुरुपयोग करून लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Havalar Gajaad with Assistant Police Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.