दावडी निमगाव येथील हातभट्टी पोलिसांनी केली उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:33+5:302021-07-14T04:14:33+5:30

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१२ रोजी खेड पोलिसांनी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास निमगाव येथे वाटेकरवाडीकडे जाणारे बंधाऱ्याच्या ...

Hatbhatti at Davdi Nimgaon was demolished by the police | दावडी निमगाव येथील हातभट्टी पोलिसांनी केली उद्ध्वस्त

दावडी निमगाव येथील हातभट्टी पोलिसांनी केली उद्ध्वस्त

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१२ रोजी खेड पोलिसांनी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास निमगाव येथे वाटेकरवाडीकडे जाणारे बंधाऱ्याच्या जवळ सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा मारला. साहेबराव शंकर शिंदे यांचे शेतजमिनीचे बाजूला भीमा नदीचे किनारी करंजाचे झुडपांमध्ये अज्ञात व्यक्तीने ही हातभट्टी सुरू केली.

खेड पोलिसांना माहिती मिळली होती. पोलीस हवालदार, योगेश भंडारे, कल्पेश गिलबिले, मोहन अवघडे यांनी छापा टाकून लोखंडी बॅरलमध्ये असलेले अंदाजे १ हजार लिटर गावठी हातभट्टीचे गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन मिळून आले हे सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केले असून हातभट्टी चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

--

फोटो क्रमांक : १३ दावडी निमगाव

फोटो ओळ: निमगाव ता. खेड येथे खेड पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचे रसायन नष्ट केले.

Web Title: Hatbhatti at Davdi Nimgaon was demolished by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.