शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:23 IST

मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत

पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी बोगस कंपन्या उघडल्या आहेत. निती आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी थेट येणाऱ्या दरवर्षीचा १५०० कोटी रूपयांचाच्या निधीचे कॉन्ट्रॅक्ट परस्पर स्वत:च्या जावायला दिले आहे. दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या नावाने बोगसपणे कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चालाखी चालणार नाही. मुश्रीफ परिवारावर कोल्हापुरातील मुरगुड ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तेथेच कारवाई करा, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष, प्रवक्ते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुणे येथे केली.

पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेऊन यासंदर्भातील आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा चलाखी करत आहेत. ते चालणार नाही. मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत. मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत. तेथूनच कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्याचा दावा करत हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.

वळसे-पाटील यांनी बनवाबनवी कमी करावी

जी कंपनी १० वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्या कंपनीच्या नावे कोट्यवधी रुपये हसन मुश्रीफ यांनी लाटले आहेत. दिलीप वळसे-पाटील यांनी बनवाबनवी कमी करावी. आता मी मुश्रीफांच्या जावयाविरोधात तक्रार दिली आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल, असेही सोमय्या म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पण सरकार शरद पवार चालवतात

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी सरकार चालवणारे राष्ट्रवादीचे शरद पवार हेच आहेत. जर मी काही गुन्हा केला असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. त्यांना कोणी अडवले आहे. त्याचबरोबर राज्यातील कुणीही चुकीची कामे केली असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत आर्थिक फसवणूक प्रकरणाबाबत भेट घेऊन आम्हाला निवेदन दिले आहे. त्याचबरोबर संबधीत इतर कागदपत्रे दिली आहेत. ती कागदपत्रे तपासून त्यावर पुढे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- राजेश बनसोडे, पाेलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, पुणे परिक्षेत्र

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफKirit Somaiyaकिरीट सोमय्याPuneपुणेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार