हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 07:10 PM2021-09-23T19:10:13+5:302021-09-23T19:25:22+5:30

इंदापूरचे तहसिलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहायक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला

harshvardhan patil candidature application karmayogi sugar factory election ncp | हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार

हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार

Next

इंदापूर : राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते  हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर ( बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज गुरुवार  ( दि. २३ ) रोजी इंदापूर प्रशासकीय भवन येथे दाखल केला. राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरचे तहसिलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, अॅड. कृष्णाजी यादव, कांतीलाल झगडे, देवराज जाधव, माऊली बनकर, बाळासाहेब पाटील, अशोक इजगुडे, शकील सय्यद, महादेव घाडगे, गोरख शिंदे, कैलास कदम, बापू जामदार, रंजना शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
    
दरम्यान या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीप्रमाणे जय्यत तयारी केल्याचे दिसत आहे. राज्यातील साखर उद्योग अडचणीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या कारखान्याची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. २४) रोजी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Web Title: harshvardhan patil candidature application karmayogi sugar factory election ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.