हर्षित बारी यांची इंदौर येथे बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:37 IST2020-11-22T09:37:57+5:302020-11-22T09:37:57+5:30

पुणे : पुण्यातील प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकारी हर्षित दिलीप बारी यांची इंदौर येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. नवी दिल्ली ...

Harshit Bari transferred to Indore | हर्षित बारी यांची इंदौर येथे बदली

हर्षित बारी यांची इंदौर येथे बदली

पुणे : पुण्यातील प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकारी हर्षित दिलीप बारी यांची इंदौर येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून ही बदली करण्यात आली आहे. नोटबंदीनंतर बेनामी संपत्ती कायद्या अंतर्गत केलेल्या कारवायांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

बारी यांनी पुणे विभागात रत्नागिरी, औरंगाबाद व पुणे येथे विविध पदांवर काम केले आहे. ते मुळचे धुळे येथील आहेत. त्यांनी धुळ्यातील एसएसव्हीपीएस कॉलेजमधून संगणकशास्त्र विषयात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.

देशात नोटबंदी लागु झाल्यानंतर बेनामी संपत्ती कायद्यांतर्गत प्राप्तीकर विभागाकडून कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये बारी यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. औरंगाबादमधील तपास कामातही त्यांनी विशेष कामगिरी केली. बारी यांची सुरूवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपअधिक्षक म्हणून निवड झाली होती.

------------------

Web Title: Harshit Bari transferred to Indore