‘हरे कृष्णा, हरे रामा’चा गजर
By Admin | Updated: January 18, 2016 01:02 IST2016-01-18T01:02:14+5:302016-01-18T01:02:14+5:30
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रावेतमधील श्रीगोविंद धाम मंदिराच्या वतीने रविवारी सुवर्णमहोत्सवाचे

‘हरे कृष्णा, हरे रामा’चा गजर
पिंपरी : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रावेतमधील श्रीगोविंद धाम मंदिराच्या वतीने रविवारी सुवर्णमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निगडी येथे ‘हरे कृष्णा, हरे रामाह्णच्या गजरात श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली.
रथयात्रेची सुरुवात दुपारी साडेतीनला यमुनानगर, निगडी येथील दत्त मंदिरापासून करण्यात आली. रथयात्रा निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, बिजलीनगर पूल, आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गाने रावेत येथील मंदिरात संपन्न झाली. मुंबईतील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधा गोपीनाथ प्रभूजी, रावेत श्रीगोविंदधाम इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोपती दास, मंदिराचे सदस्य उमेश बिराजदार, माजी नगरसेविका सुमन पवळे, मनविसे शहराध्यक्ष सचिन चिखले, अश्विनी चिखले, उद्योजक सोमनाथ भोंडवे,नेताजी काशीद आणि नागरिक उपस्थित होते.
गोपती दास यांनी सांगितले की, संपूर्ण विश्वात बंधूता निर्माण व्हावी, शांतता निर्माण व्हावी या या उद्देशाने ही रथयात्रा नियमितपणे काढली जाते. प्रवचनालाही हजारो भाविक उपस्थित असतात. (प्रतिनिधी)