नांदे येथून अट्टल गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST2021-09-08T04:16:50+5:302021-09-08T04:16:50+5:30

अक्षय सुनील शेलार (वय २४, रा. बोथरवाडी, ता. मुळशी) व सनी श्याम चव्हाण (वय २३, रा. आंबेगाव, ता. मुळशी) ...

Hardened criminals arrested from Nand | नांदे येथून अट्टल गुन्हेगारांना अटक

नांदे येथून अट्टल गुन्हेगारांना अटक

अक्षय सुनील शेलार (वय २४, रा. बोथरवाडी, ता. मुळशी) व सनी श्याम चव्हाण (वय २३, रा. आंबेगाव, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गंभीर गुन्ह्यामधील फरार आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्यानुसार आदेशान्वये दहशतवादविरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त करत होते. या वेळी पथकामधील विशाल भोरडे व मोसिन शेख यांना गोपनीय खबऱ्यामार्फत पौड पोलीस ठाण्यात मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी नांदे गावाजवळ येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पथकाने फरार असलेले शेलार व चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी पौड पोलीस ठाण्यात सुपूर्त केले आहे.

Web Title: Hardened criminals arrested from Nand