पुणे : शेजारच्या घरात राहाणारा दोन वर्षांचा मुलगा खेळत खेळत घरी आल्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
कैसर ताहिर हुसेन (मूळ रा. मोहल्ला असारनगर, रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये पीडित मुलाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत. दंडाची रक्कम न भरल्यास कैसर यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आदेशात नमूद केले आले आहे. २ फेब्रुवारी २०१५ रोजी भोर गावच्या हद्दीत ही घटना घडली. याबाबत २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. बी. साळवे यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी सचिन अडसूळ यांनी मदत केली.
-------------------------