शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात पुन्हा वाढदिवसानिमित्त धडामधूम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:53 IST

चक्क फटाक्यांची माळ लावली..

ठळक मुद्देबाजार घटकांची सुरक्षा धाब्यावर : आडत्यांकडून आनंदोत्सव स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिगत कार्यक्रमास बंदी प्रशासनाकडून देखील अशा लोकांवर कडक करवाई करणे टाळले जात असल्याची चर्चा

पुणे : मार्केट यार्डात पडलेला फळे, भाजीपाल्याचा कचरा, लाकडी फळ्या , पेढा असा सुका कचरा मोठ्या प्रमाणात असताना बाजार घटकांची सुरक्षा धाब्यावर बसवत आडत्यांकडून नियमित वाढदिवसानिमित्त फटाके वाजविण्याचे प्रकार होत आहेत. बुधावरी देखील अशा एका वाढदिवसानिमित्त फळ विभागात ११.१५ च्या सुमारस एका गाळ्यासमोर चक्क फटाक्यांची माळ लावून धडामधूम... करण्यात आले. बंदी असताना आडत्यांकडून मात्र नियमितपणे वाढदिवसांच्या आनंदोत्सव साजरा केला जात आहे. बाजार समिती प्रशासनाकडून देखील अशा लोकांवर कडक करवाई करणे टाळले जात असल्याची चर्चा बुधवारी सुरु होती. बाजार समिती आवारातील गाळे हे शेतीमाल व्यापारासाठी आहेत. दररोज येथे व्यापारासाठी शेतीमालाची मोठी अवक  होत असते. त्यामुळे येथे स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिगत कार्यक्रमास बंदी घातली आहे व्यापाऱ्यांनी ज्वालाग्राही पदार्थ बाळगायचे नाहीत, असाही नियम आहे. बाजार आवारात काही दिवसापूर्वी प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये फटाके वाजविले होते. त्यानंतर आत्ता गाळ्यावर फटाक्यांची माळच लावली होती. बाजार समिती २७ डिसेंबर नवीन नियम बाजारात लागू करत आहे. या नियमानुसार बाजार आवारात खासगी व्यक्ती आणि शेतीमालाची खरेदी-विक्री करण्याव्यतिरिक्त येणाऱ्या वाहनाना प्रवेशास बंदी घातली आहे तसेच गळ्यापासून पुढे १५ फुटापर्यंत माल विकण्यास परवानगी दिली आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्याला पाच हजार रुपये आणि जीएसटी दंड म्हणून आकारणार आहे. बुधवारी नियमाचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाजार घटक नियमांचे पालन करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान संबंधित व्यापाºयाला याबाबत नोटीस बजावली असल्याची माहिती फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली. आपली अनुज्ञप्ती लायसन रद्द का करू नये, याबाबत सात दिवसात खुलासा  द्यावा, असे या नोटिशीत म्हटले असल्याचे बिबवे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड