शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याबाबत जे घडलं ते आषाढी वारीत घडू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 14:09 IST

वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार आपल्याला  केला पाहिजे.

बारामती : कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारीबाबत घडू नये. यासाठी सर्वांशी चर्चा करून यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. परंपरा टिकली पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं मात्र तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना असताना त्याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने यंदाच्या वर्षीदेखील आषाढी पालखी सोहळा बसने होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील मानाच्या १० पालखी सोहळ्याला ६० वारकऱ्यांसह १९ जुलैला पंढरपूरला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर बारामती येथे माध्यमांशी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

पवार पुढे म्हणाले,  राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे.  वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार आपल्याला  केला पाहिजे. सर्व अधिकारी,पोलिस अधिकारी यांनी सर्वांशी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.  वाखरीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठी शिथिलता देण्यात आली आहे.  मागील वर्षी जसे निर्बंध होते, तसे आता निर्बंध लावलेले नाहीत. कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे.  आम्ही वारकरी सांप्रदायाच्या भावनांचा आदर करतो, राज्याचं आरोग्याचं हित याकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं काही बाबतीत सर्व विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. आताही वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील, तर विभागीय आयुक्तांना सुचना देऊ. संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्याबाबत सांगू, असेही पवार म्हणाले.-----------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpur Wariपंढरपूर वारीAjit Pawarअजित पवार