शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 21:14 IST

प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे.

ठळक मुद्देबलुतेदारीमध्ये लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान दिवसाला ७० ते ८० केरसुण्या बांधल्या जातातमातंग समाजाची व्यथा ; आंध्रप्रदेश, कर्नाटक, या राज्यातून स्थलांतरदिवाळी सण सोडला तर इतरवेळी महिला धुणीभांडी, पुरुष, लग्नसराईमध्ये वाजंत्र्याचे काम भविष्यात हा व्यवसाय टिकेल का नाही याची शंका

अमोल अवचिते पुणे:  दिवाळीला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात केरसुणी लक्ष्मी म्हणून पुजण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आजदेखील घराघरात पाळली जाते. लोकांच्या घरामध्ये पुजली जाणारी लक्ष्मीची ज्या घरामध्ये निर्मिती होते ती घरं ऐन दिवाळीत आज देखील अंधारात असतात. त्यांच्या अठरा विश्व दारिद्रय हे पाचवीलाच पुजले आहे. कितीही कष्ट केले तरी मिळणारा मोबदला अल्पच. व्यापारी कवडीमोल भावाने केरसुणी विकत घेतात. यातून होणारी आर्थिक पिळवणूक उघड्या डोळांनी पाहावी लागते. महाराष्ट्रातील मातंग समाज झोपडपट्टीमधील मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहून 'लक्ष्मी' म्हणजेच केरसुणी बांधण्याचे काम  वर्षानुवर्षे करतोय.दिवाळी सणामध्येच केरसुनी बनवण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीमध्ये दिवसाला ७० ते ८० केरसुण्या बांधल्या जातात. तसे पाहता एकूणच १० ते १५ दिवसांच्या या दरम्यान सुमारे एक हजार ते दीड हजार केरसुण्या बांधून होतात. यातून मिळणारा मोबदला मात्र किरको़ळच असतो. केरसुणी २५ ते ३० रुपयांना विकली जाते. तर आधुनिक झाडूची किंमत १०० रुपयांच्या घरात आहे. केरसुणीच्या या किंमतीला देखील ग्राहकाकडून मोलभाव केला जातो. त्या विक्रीतुन गरज भागवेल इतकासुध्दा आर्थिक लाभ होत नाही.याच पैशातून मुलाबाळांना नवीन कपडे,, घरातलं आजारपण, लोकांची देणी, असा प्रपंच हाकला जातो. यात दिवाळी सण सोडला तर इतर दिवशी घरातील महिला धुणीभांडी, पुरुष, लग्नसराईमध्ये वाजंत्र्याचे काम करतात. तरीदेखील परिस्थतीशी दोन हात सुरुच असतात.       बलुतेदारीमध्ये लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान आहे तर लक्ष्मीची निर्मिती करणारे कसबी हात मात्र दारिद्रयाच्या अंधारात अजूनही चाचपडत आहेत. प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे. केरसुणीला देवत्व देणाऱ्याकडून तिला जन्माला घालणाऱ्याला माणसांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावण्याची आस आहे. आमच्या कुटुंबाना सुखाचे दिवस ‘लक्ष्मी’ने दाखवावे आता हेच मनापासून वाटतं....................... शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी दक्षिण भारतीय केरसुणी विक्रेते दिवाळीमुळे दिसून येतात. हे नागरिक मूळचे आंध्रप्रदेशातील असून 'येरुकुला' आणि कुचीकर  या भटक्या जमातीचे आहेत. या समाजाचा केरसुणी बांधणे हा पिढीजात व्यवसाय आहे. आंध्रप्रदेश,  कर्नाटक, या राज्यातून स्थलांतर करतात. ..................................... शिंदीच्या झाडापासून केरसूनी बनवीली जाते. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. पुणे (जुन्नर),औरंगाबाद (सोयगाव) आणि आंध्रप्रदेशातून प्रामुख्याने मालाचा पुरवठा होतो. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे काँक्रिट जंगल वाढलं. परिणामी शिंदीच्या झाडांचे ही प्रमाण दिवसेंदिवस  कमी होत चालेले आहे. नवीन पिढी पिढीजात व्यवसाय करण्यास इच्छूक नाही. त्यामुळे कसबी कारागिरांची संख्या  कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय टिकेल का नाही याची शंका आहे.

 ............................. शिक्षण नसल्याने सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नसते. अंधश्रद्धा आणि आर्थिक कारणामुळे समाज नेहमीच विकासच्या मुख्य प्रवाहात मागे राहिला आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये जर या समाजाला टिकायचे असेल तर शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणायला हवे. संजय कोळेकर प्राध्यापक समाजशात्र विभाग ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे)  ..................... रोजणदारीवर जाण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय कधीही चांगला. कष्ट भरपूर आहेत. त्या बदल्यात मोबदला कमी मिळतो तरी हा व्यवसाय करत आहे. अजूनही मराठी घरांमध्ये लक्ष्मीला मानसन्मान आहे.   गुलाब आदमने ( व्यावसायिक, मांजरी )

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी