हगणदारीमुक्तीला अडथळा इंदापूरचा

By Admin | Updated: February 17, 2017 04:42 IST2017-02-17T04:42:11+5:302017-02-17T04:42:11+5:30

गेल्या ७ महिन्यांपासून जिल्ह्यात हगणदरीमुक्ती मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत १३ तालुक्यांपैैकी ६ तालुके हगणदरीमुक्त

Handicapped Empower Indapur | हगणदारीमुक्तीला अडथळा इंदापूरचा

हगणदारीमुक्तीला अडथळा इंदापूरचा

पुणे : गेल्या ७ महिन्यांपासून जिल्ह्यात हगणदरीमुक्ती मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत १३ तालुक्यांपैैकी ६ तालुके हगणदरीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नुकताच पुरंदर तालुका हगणदरीमुक्त झाला आहे. इतर तालुक्यांतही कमी प्रमाणात काम शिल्लक आहे; मात्र इंदापूर तालुक्यात अजूनही ७,९१७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. तालुक्यात २१ गावे अशी आहेत, की तिथे आजही १०० पेक्षा जास्त कुटुंबांकडे शौचालये नाहीत.
गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतलेली मोहीम म्हणजे जिल्हा हगणदरीमुक्ती. ३१ डिसेंबर ही डेडलाईन जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविली होती. मात्र, तोपर्यंत ४ तालुके १०० टक्के करण्यात प्रशासनाला यश आले होते. शासनाने ३१ मार्च ही डेडलाईन दिली असून, प्रशासनाकडून या तारखेपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आता हवेली व पुरंदर हे दोन तालुके करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. आतापर्यंत मुळशी, भोर, वेल्हे, खेड, हवेली, पुरंदर हे तालुके हगणदरीमुक्त झाले असून इंदापूर, बारामती, मावळ, आंबेगाव, जुन्नर, शिरूर व दौैंड हे ७ तालुके अद्याप बाकी आहेत.
जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ३८५ कुटुंबे असून, त्यांपैैकी आतापर्यंत ६ लाख ४ हजार २४२ कुटुंबांकडे शौचालये आहेत. अद्याप १३ हजार ६१० कुटुंबे बाकी असून, त्यात एकट्या इंदापूर तालुक्यातील ७ हजार ९१७ कुटुंबे आहेत. त्यानंतर बारामतीतील १ हजार ७२१, मावळमधील १ हजार ४३४, आंबेगावमधील १ हजार १४६, जुन्नरमधील ६८१, शिरूरमधील ३६१ तर दौैंडमधील फक्त ३३० कुटुंबांकडे शौचालये नाहीत.
इंदापूर तालुक्यात ८६.८१ टक्के काम झाले आहे. अद्याप ७ हजार ९१७ कुटुंबांकडे शौैचालये नाहीत. २१ गावे अशी आहेत, की तेथे १०० पेक्षा जास्त कटुंबांकडे शौैचालये नाहीत. यात येथील लोकप्रतिनिधीच्या गावांचाही समावेश आहे. त्यामुळे उर्वरित दीड महिन्यात प्रशासनाला या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून मोठे काम करणे गरजेचे आहे.

Web Title: Handicapped Empower Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.