मुळा मुठा नव्या कालव्याला सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST2021-07-19T04:08:51+5:302021-07-19T04:08:51+5:30
मुळा-मुठा उजवा कालवा मागील सुमारे महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे त्यावर आधारित गावांच्या पाणीपुरवठा योजनांना ग्रहण लागून त्या गावांच्या पिण्याच्या ...

मुळा मुठा नव्या कालव्याला सोडले पाणी
मुळा-मुठा उजवा कालवा मागील सुमारे महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे त्यावर आधारित गावांच्या पाणीपुरवठा योजनांना ग्रहण लागून त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आ वासून समोर उभी राहिली होती. पण लोकमतच्या बातमीने पाटबंधारे खात्याला जाग आली आणि त्यांनी रद्द केलेले आवर्तन तातडीने १६ जुलैला सोडले. उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची जी समस्या तीव्रतेने जाणवत होती, ती सुरळीत करण्यास मदत केली. गेल्या पंधरवड्यापासून उरुळी कांचन गावाच्या अनेक भागांत दिवसातून एकदा तर काही भागांत एक दिवसाआड ते पण कमी दाबाने तर काही भागांत तीन दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. उरुळी कांचन गावाची पिण्याच्या पाण्याची सोय सध्यातरी पूर्णपणे मुळा-मुठा उजवा कालव्यावर अवलंबून आहे.