पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्याला मंडळाचा हात
By Admin | Updated: March 22, 2017 03:25 IST2017-03-22T03:25:18+5:302017-03-22T03:25:18+5:30
नाशिकचा रहिवासी असणाऱ्या देव तिवारी या दहावीच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे १८ मार्च रोजी निधन झाले. मात्र, देव हा नेवासी

पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्याला मंडळाचा हात
पुणे : नाशिकचा रहिवासी असणाऱ्या देव तिवारी या दहावीच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे १८ मार्च रोजी निधन झाले. मात्र, देव हा नेवासी फाटा येथे त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमधून परीक्षा प्रविष्ट झाल्याने त्याची परीक्षा नेवासा येथेच घेतली जात होती. परंतु, वडिलांचा अंत्यविधी १८ मार्च रोजी नाशिक येथे होणार होता. त्याच दिवशी त्याचा विज्ञान भाग १ विषयाचा पेपर होता. त्यामुळे देवच्या शाळेच्या प्राचार्यांनी त्याची परीक्षा नाशिक येथे घेण्याबाबत मंडळाकडे विनंती केली. मंडळानेही ही विनंती तत्काळ मान्य करत त्याची परीक्षा नाशिक येथे घेण्यास परवानगी दिली. देव तिवारी याला यापुढील सर्व विषयांचे पेपर आता नाशिक येथून देता येणार आहेत, असे पुणे विभागीय मंडळाने कळविले आहे. देव या विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना वस्तूस्थिती लक्षात घेऊन मंडळाने त्याला मदतीचा हात दिला. त्यामुळे देव पुढील सर्व विषयांचे पपेर देऊ शकणार आहे.