धरणो फुल्ल
By Admin | Updated: September 6, 2014 00:10 IST2014-09-06T00:10:26+5:302014-09-06T00:10:26+5:30
जिल्ह्यातील कलमोडी, चासकमान, वडिवळे, घोड, आंध्रा, पवना, टेमघर, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर ही 1क् धरणो 1क्क् टक्के भरली आहेत,

धरणो फुल्ल
जिल्ह्यातील कलमोडी, चासकमान, वडिवळे, घोड, आंध्रा, पवना, टेमघर, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर ही 1क् धरणो 1क्क् टक्के भरली आहेत, तर मुळशी, वरसगाव, पानशेत, उजनी 98 ते 99 टक्के भरली आहेत. ही धरणो शनिवारी किंवा रविवारी पूर्ण भरतील. त्यामुळे त्यातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत आजर्पयत 8क्5 मि.मी. पाऊस झाला आहे. आज दुपारपासून डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून सुमारे 9915 क्युसेक्स एवढय़ा जलद गतीने पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुळे घोड नदीपात्रत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात तसेच डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. काल रात्रीपासून आदिवासी भागातील गावे पावसाने झोडपून काढली आहेत. पावसामुळे पाटण आहुपे व भीमाशंकर खो:यातील असंख्य नदी-नाल्यांन पूर आले आहेत. येत असलेले पाणी डिंभे धरणात अतिशय जलद गतीने जमा होत असल्याने आज दुपारपासून धरणाचे पाचही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. धरणपातळी 95क् वर गेली असल्याने धरणातून सध्या 9915 क्युसेक्स एवढय़ा गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैकी सांडव्याद्वारे 93क्क् क्युसेक्स तर विजघर व कॅनॉलद्वारे 65क् क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
डिंभे धरणातून मोठय़ा प्रमाणात घोड नदीपात्रत पाणी येत असल्याने नदीपात्रत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या खालच्या गावांतील डिंभे, शिनोली, गंगापूर, कानसे, पिंपळगाव, शिंदेवाडी या गावांजवळील नदीपात्र दुथडी भरून वाहत आहेत. यंदाच्या पावसाळी हंगामात घोड नदीपात्रतून एवढय़ा मोठय़ा प्रमाणत पाणी वाहण्याची ही पहिलीच वेळ असून, गंगापूरजवळील बोडकी परिसरात उसाचे पीकही पाण्याखाली गेले आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणातून पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्याने घोड नदीपात्रत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
उजनी जलाशय तुडुंब
पळसदेव : उजनी धरण जवळजवळ शंभर टक्के भरले आहे. शुक्रवारी दुपार्पयत उजनी धरण 99 टक्के भरले होते. अजून एक दिवसामध्ये उजनी जलाशयातील पाणीपातळी शंभर टक्के होईल. सध्या उजनी जलाशयामध्ये दौंड येथून 21137 क्युसेक्स, तर बंडगार्डन (पुणो) येथून 14545 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जलाशयात येत असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
उजनी धरण हे इंदापूर, दौंड, कजर्त, करमाळा व सोलापूर जिल्ह्यास मोठे वरदान समजले जाते. शेती, कारखाने यांसह अनेक औद्योगिक वसाहतींना येथूनच पाणीपुरवठा होतो. मागील एक दीड महिन्यापूर्वी उजनीची पाणीपातळी ‘उणो’ (वजा) झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पुणो शहरास जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनीच्या पाणीपातळीत दमदार वाढ झाली. दौंड व बंडगार्डन येथूनही मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत असल्याने, शुक्रवारी दुपार्पयत उजनीमध्ये 99 टक्के पाणीसाठा होता. अजून एक दिवसात उजनी ‘शंभरी’ ओलांडेल, असा अंदाज आहे. उजनी जलाशय तुडुंब भरल्याने जलाशयालगतचा शेतकरीवर्ग आनंदी झाला आहे. पाण्याअभावी बंद पडलेल्या पाणी उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे उजीन जलाशयातून कॅ नॉलद्वारे 15 हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे.
जलप्रदूषणाचा मोठा धोका?
4उजनी जलाशयामध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड येथूनही मोठय़ा प्रमाणात पाणी येते. मात्र, हे पाणी येत असताना जलपर्णी, कचरा आदी वस्तू येतात. त्यामुळे उजनीचे जलप्रदूषण होत आहे. त्याचबरोबर कारखान्यांमधून सोडण्यात आलेले रासायनिक पदार्थ याचीही भर पडते. त्यामुळे उजनीच्या जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार हे निश्चित.