शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मार्केटयार्डात दिला 'हमाल ऑफ द इअर' पुरस्कार; 3 हजार कामगारापैकी निवडले सर्वोत्कृष्ट 3 हमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:23 IST

हा पुरस्कार या हमालांना कसा मिळाला ते जाणून घ्या...

किरण शिंदे/प्रतिनिधी पुणे : आजवर आपण स्टुडन्ट ऑफ द इयर, एम्प्लॉयी ऑफ द इयर या नावाने पुरस्कार दिल्याचे ऐकले असेल. परंतु 'हमाल ऑफ द इयर' असा पुरस्कार दिल्याचं ऐकलं आहे का? नक्कीच ऐकलं नसणार. परंतु असा पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या तीन हमालांना हा पुरस्कार देण्यात आला. तर हा पुरस्कार या हमालांना कसा मिळाला त्याची माहिती जाणून घेऊया.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत अंदाजे दोन ते तीन हजार ट्रक दररोज शेतमाल घेऊन येत असतात. हा शेतमाल उतरवण्यासाठी जवळपास तीन हजार माथाडी कामगार याठिकाणी काम करतात. कामगारांचं हे काम कष्टाचं, ओझ्याचं आणि अनिश्चिततेचं आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या तीन कामगारांची सर्वोत्कृष्ट हमाल म्हणून निवड करण्यात आली. मार्केटयार्डातील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक वाढवण्याचं काम केलं अशांना पुरस्कार दिले जातात.

यावर्षीचा हा पुरस्कार रवींद्र सोनवणे, शशिकांत शिंदे आणि प्रशांत काची या तीन हमालांना देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर या हमालांनी लोकमतशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

कसे निवडले विजेते-

ज्यांनी आतापर्यंत चांगले काम केले. ज्या हमालांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले, कोणताही नशा केला नाही, समाजात चांगले योगदान ज्या हमालांनी दिले, अशा कामगारांना पुरस्कार देिले गेले.

हमालांचं काम तसं सोपं नसतं. हलाखीच्या परिस्थितीत आणि तुटपुंज्या पैशात हे काम करावं लागतं. त्यात लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा असतो. दुसरा पर्याय नसल्याने हे काम करणं त्यांना भाग आहे. परंतु अशा परिस्थितीतही कोणी आपल्या कामाची दखल घेतं आणि पुरस्कार देऊन कौतुक करतं तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो, अशी भावना या पुरस्कार विजेत्या हमालांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड