शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

चासकमान धरणाची पातळी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:25 IST

५०.७० टक्के पाणी उपलब्ध : भविष्यात पाणीटंचाईची समस्या होणार गंभीर

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात केवळ ५०.७० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे येत्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चासकमान धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात आले होते. परंतु, परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीनुसार सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेल्या खरीप हंगामाची पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच, १२ आॅक्टोबर रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात येणार होते. परंतु, शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कालव्याद्वारे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. खेड तालुक्यातील भीमा नदीतील पाणी संपुष्टात आल्यामुळे नदी अंतर्गत असलेल्या शेतकºयांची पिके धोक्यात आली होती. यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकºयांनी २९ तारखेला भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊनही या निवेदनाची दखल न घेतल्याने शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता. अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग कार्यालयाने या पत्राची दखल घेत त्याअनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाची दखल घेऊन प्राधान्याने बंधाºयात पाणी सोडले होते.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांनी आपल्या शेतात रब्बी हंगामातील घेण्यात आलेल्या कांदा, बटाटा, मका, गहू, आदी सह हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन हजारो हेक्टर पिकांना बहुतांशी प्रमाणात फायदा होणार आहे. परंतु, धरणांतर्गत असलेल्या शेतकºयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

परतीच्या पावसाने दडी मारल्याने चासकमान धरणातून शेतकºयांच्या मागणीनुसार खरीप हंगामाचे पहिले आवर्तन तब्बल ८९ दिवस सुरू ठेवल्याने ऐन आॅक्टोबरमध्ये पाण्याची पातळी खालावली. तसेच, दुसरे आवर्तन ४४ दिवसांपासून ५८५ क्युसेकने सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी खालावली यामुळे पाणलोट क्षेत्रातील डेहेणे, वाडा, वाळद, सुरकुंडी, आव्हाट परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून, परिसरातील गावातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.अखेर धोम-बलकवडीचे पहिले आवर्तन सुटले1 भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील धोम-बलकवडी धरणाच्या विसगाव, चाळीसगाव खोºयातून गेलेल्या डाव्या कालव्याला पहिले आवर्तन सोडण्याच्या शेतकºयांच्या मागणीला अखेर आमदार संग्राम थोपटे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. रविवार (दि. १६) कालव्याला ३२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे रब्बीतील पिके जोमात येणार असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.2तालुक्याचा दक्षिण पट्टा हा दुर्गम व डोंगरी असल्याने दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई भासते. पिकांना पाण्याची टंचाई पाहता धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटणे गरजेचे होते.3कालव्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. ते काम जलसंपदा विभागाने त्वरित पूर्ण केले आहे. पाणी दहा ते पंधरा दिवस उशिरा सुटले असले, तरी या पाण्यावर रब्बी जोमात येणार असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे. हे आवर्तन २८फेब्रुवारीपर्यंत देण्यात येणार आहे.धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, तसेच पाणी सोडताना कालव्यांतर्गत असलेल्या शेतकºयांना विश्वासात न घेता पाणी सोडण्यात येत असल्याने चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे.मागील दोन आठवड्यांपूर्वी कालव्या अंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे ‘धरण उशाशी, शेतकरी उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थीती यावर्षीही निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरण