शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

धरणांतील साठा निम्म्यावर

By admin | Updated: September 1, 2015 04:17 IST

पावसाअभावी पुणे व आसपासची धरणे अर्ध्यापेक्षाही कमी भरली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत

पुणे : पावसाअभावी पुणे व आसपासची धरणे अर्ध्यापेक्षाही कमी भरली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या मुळा खोऱ्यातील ४ धरणांमध्ये मिळून अवघा १४.७७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात तो २६.४२ दशलक्ष घनफूट होता.पुणे शहराचा पाणीपुरवठा याच चार धरणांवर अवलंबून आहे. सुरुवातीच्या काळात धरणक्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने जी पाठ फिरवली, ती सप्टेंबर सुरू झाला तरी अद्याप कायम आहे. मुळा खोऱ्याबरोबरच पुण्याच्या आसपासच्या सर्वच धरणांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती गंभीर आहे.नीरा खोऱ्यात पवना, कासारसाई, मुळशी, कलमोडी, चासकमान, भामा-आसखेड, आंध्र, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांमध्ये मिळून फक्त २६.३३ घनलक्ष फूट पाणीसाठा आहे. मागील वर्षी या महिन्यात हा पाणीसाठा ४४.९७ दशलक्ष घनफूट होता. नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड ही धरणे कुकडी खोऱ्यात येतात. त्यामध्ये मागील वर्षी या महिन्यात २८.६७ दशलक्ष घनफूट पाणी होते. यंदा ते फक्त फक्त १०.४४ दशलक्ष घनफूट आहे. त्यातही घोड, नाझरे ही धरणे ठणठणीत आहेत.कृष्णा उपखोऱ्यात धोम बलकवडी, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव ही धरणे कृष्णा उपखोऱ्यात येतात. त्यातील एकूण पाणीसाठा बऱ्यापैकी चांगला म्हणजे १६४.६१ दशलक्ष घनफूट आहे. मागील वर्षी तो १९५.८६ दशलक्ष घनफूट होता. या धरणांमध्ये पाणी दिसत असले तरी तिथेही धरणक्षेत्रात सध्या पावसाने दडीच मारलेली आहे. (प्रतिनिधी)