शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला, खेड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 21:29 IST

चारजण गंभीर जखमी; आरोपींना अटक

शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता.खेड) येथे गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चाकण पोलिसांनी हल्लेखोरांना बुधवारी (दि.१८) सकाळी अटक केली आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.१७) रात्री दहाच्या सुमारास घडली. सिद्धेगव्हाण येथे गायरान जागेत वास्तव्यास असलेल्या पवार आणि भैरवकर या दोन कुटुंबात जागेच्या हद्दीवरून वाद होता. या वादातून प्रमोद उर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा.सिद्धेगव्हाण ता.खेड) यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पवार कुटुंबातील चार जणांवर धारदार तलवारीने खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात चंद्रकांत किसन पवार (वय ४२), प्रतीक चंद्रकांत पवार (वय १८), चैतन्य उर्फ सोन्या चंद्रकांत पवार (वय १६) व कमल चंद्रकांत पवार (वय ३९ सर्व रा. सिद्धेगव्हाण) हे गंभीर जखमी झाले आहेत.

रात्रीच्या सुमारास झालेला आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घटनेचा पंचनामा करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.         याप्रकरणी प्रमोद उर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा.सिद्धेगव्हाण ता.खेड) या तीन जणांना पोलिसांनी अटक केली  आहे. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा आदेश खेड न्यायालयाने सुनावला आहे. यापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक