शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास अर्ध्यात आणि ‘अश्वमेध’ अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 13:48 IST

एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या अश्वमेध व शिवनेरी या वातानुकूलित आरामदायी बस आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांकडून तिकिटाचे प्रत्येकी ४४० रुपये चालकाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण

पुणे : तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव चालकाने प्रवाशांना अश्वमेध बसमधून बाणेरजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरच उतरविल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. सर्व प्रवाशांची जाण्याची व्यवस्था होण्यापूर्वीच हा चालक बससह पुढे निघून गेल्याने प्रवाशांना धक्का बसला. या मार्गावर बराच वेळ काही प्रवाशांना रिक्षा किंवा इतर वाहन न मिळाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या अश्वमेध व शिवनेरी या वातानुकूलित आरामदायी बस आहेत. प्रामुख्याने पुणे ते मुंबई, पुणे ते ठाणे, पुणे ते बोरिवली मार्गावर या बस सोडण्यात येतात. इतर बसच्या तुलनेत तिकीटदर अधिक असूनही या सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसादही मिळत आहे. पण बसमधील सोयी-सुविधांबद्दल प्रवाशांकडून विविध तक्रारी केल्या जात आहेत. बस मार्गातच बंद पडणे, अस्वच्छता, पडदे खराब असणे, बंद चार्जिंग पॉईंट, वातानुकूलित यंत्रणा बंद असणे अशा तक्रारी सातत्याने केल्या जातात. बस मार्गातच बंद पडण्याचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जातो. पण प्रवाशांना अनेकदा असा अनुभव येत आहे. शुक्रवारीही प्रवाशांना अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. ठाणे वंदना येथून दुपारी साडेतीनच्या सुमारास अश्वमेध ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. शिवनेरी बस उपलब्ध न झाल्याने अश्वमेध सोडली. बस रात्री आठच्या सुमारास बाणेरजवळ आल्यानंतर चालकाने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. महामार्गावरच बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. काही वेळात मागून बोरीवली येथून आलेल्या शिवनेरी बसमध्ये त्यांना जागा देण्याचा प्रयत्न केला. पण बसमध्ये पुरेशा जागा नसल्याने तसेच उभे राहिल्यानंतर आधारासाठी काही व्यवस्था नसल्याने काही प्रवासी खालीच थांबले. पुढे शिवनेरी बस गेल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने थांबविण्यात आलेली बसही चालकाने दामटली. हा प्रकार पाहून प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे चालकाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, एसटी अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत उशिरापर्यंत माहिती मिळाली नव्हती.......प्रवाशांना मनस्तापप्रवाशांकडून तिकिटाचे प्रत्येकी ४४० रुपये घेण्यात आले. पण त्यांना रस्त्यातच सोडून बसचालक निघून गेला. काही प्रवासी दुसºया बसने निघून गेले. पण जागेअभावी काही प्रवाशांना तिथेच थांबावे लागले. .......महामार्गावर जाण्यासाठी रिक्षा किंवा इतर कोणतेही वाहन मिळत नव्हते. मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना जावे लागले. या प्रवाशांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक, महिलाही होत्या. त्यांच्याकडे मोठ्या बॅगा होत्या. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. बसचालकाच्या या वागणुकीवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला............परतावा मिळणार का ?बस बंद पडल्यानंतर दुसरी बस उपलब्ध होईपर्यंत चालक किंवा वाहक तिथेच थांबून राहतात. पण शुक्रवारी घडलेल्या प्रकाराने प्रवासी हैराण झाले. एसटीचे ४४० रुपयांचे तिकीट काढूनही पुन्हा दुसºया वाहनासाठी पैसे घालवावे लागले. प्रवाशांचे हे आर्थिक नुकसान एसटीने भरून द्यायला हवे. याची भरपाई एसटीने द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स