दीडशे फुटांची भेग
By Admin | Updated: August 5, 2014 23:18 IST2014-08-05T23:18:20+5:302014-08-05T23:18:20+5:30
तुंग किल्ल्याच्या (मावळ) पायथ्याशी भैरवनाथ मंदिराशेजारील जमीनीला सुमारे 15क् मीटर लांबी आणि 7 इंच रूंद अशी भेग पडली आहे.

दीडशे फुटांची भेग
पिंपरी-चिंचवड /पवनानगर : तुंग किल्ल्याच्या (मावळ) पायथ्याशी भैरवनाथ मंदिराशेजारील जमीनीला सुमारे 15क् मीटर लांबी आणि 7 इंच रूंद अशी भेग पडली आहे. त्यामुळे तुंग ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
तुंग किल्ला (सुळका) 2क्क् मीटर उंचीचा असून पायथ्याशी तुंगगाव वसलेले आहे. पायथ्याशी पूर्वेस जमीनीला भेग पडली आहे. सुरूवातीला ही भेग कमी होती आता ती वाढली आहे.
येथील पाच फुटाच्या अंतरावरील भैरवनाथाचे मंदिराच्या भिंतीला तडे गेले आहेत. संबंधित ठिकाणजवळ दोन घरे आहेत. त्यांना स्थलांतराचे आदेश दिले असुन ऐन पावसात कोठे राहायला जायचे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहेत.
सरपंच मनिषा म्हसकर म्हणाल्या, ‘‘ किल्याची उंची जास्त आहे. पाऊस कमी होत नाही व माळीण गावची घटनेचा विचार करता शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी. गाव वाचवावे.’’ (वार्ताहर)
भीती कायम
गावची लोकसंख्या 11क्क् आहे. दि 3क् जुलैला किल्याच्या पायथ्याचा काही भाग ढासळला होता. गावातील पीठ गिरणी व एक किराणा दुकान थोडक्यात बचावले. मात्र, कोणतीही हानी झाली नाही. किल्ल्याचा टोकदार भाग ढासळला तर खूप माठे संकट येऊ शकते. म्हणून या भागात भीतीचे वातावरण आहे.
घेरा पुरंदरमध्ये
दरड कोसळली
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घेरा पुरंदर ग्रामपंचायत हद्दीत नारायणपेठ जवळ पुरंदर किल्ल्याचा लगत असलेला डोंगर कडा सोमवार रात्नी 7 वाजून 45 मिनिटांनी कोसळू लागला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्न शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. / वृत्त पान 2