शहराचा निम्मा भाग अंधारात

By Admin | Updated: June 2, 2017 02:57 IST2017-06-02T02:57:53+5:302017-06-02T02:57:53+5:30

जेजुरी येथून येणारी महापारेषणच्या ४०० केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने निम्म्या पुणे शहराचा वीजपुरवठा

Half of the city is in the dark | शहराचा निम्मा भाग अंधारात

शहराचा निम्मा भाग अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जेजुरी येथून येणारी महापारेषणच्या ४०० केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने निम्म्या पुणे शहराचा वीजपुरवठा रात्री १०़१५ वाजता खंडित झाला असून, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नव्हता़
जेजुरीहून येणाऱ्या उच्चदाब वाहिनीतील बिघाडाने महापारेषणचे पर्वती, कोंढवा, नांदेड सिटी, कोथरूड, रास्ता पेठ या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला़ त्यामुळे या उपकेंद्रांतून वीजपुरवठा होणाऱ्या कोंढवा, वानवडी, पर्वती, पद्मावती, बिबवेवाडी, कोथरूड, वारजे, बंडगार्डन, हडपसर, सिंहगड रोड, स्वारगेट, सदाशिव पेठेतील वीजपुरवठा खंडित झाला आहे़

Web Title: Half of the city is in the dark