हडपसर खून प्रकरणी १९ जणांच्या पेालिस कोठडीत वाढ
By Admin | Updated: June 9, 2014 23:40 IST2014-06-09T23:05:05+5:302014-06-09T23:40:25+5:30
पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या १९ जणांची न्यायालयाने १२ जूनपर्यत पोलिस कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

हडपसर खून प्रकरणी १९ जणांच्या पेालिस कोठडीत वाढ
पुणे : एका तरूणाचा खून केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या १९ जणांची न्यायालयाने १२ जूनपर्यत पोलिस कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
विशाल गोविंद सुत्रावे (वय २१, रा. तुकाई दर्शन), अतुल राजेंद्र आगम (वय २१, रा. गोंधळेनगर), रणजीत शंकर यादव (वय २४, रा. काळेपडळ), सागर चंद्र्रकांत सुतार (वय १९, रा. भेकराईनगर), शुभम दत्तात्रय बरडे (वय १९, काळेपडळ), दादा मोडक उर्फ शेखर अनिल मोडक (वय १९, र. वडकी गाव), आकाश रमेश लष्करे (वय १९, रा. वडकी गाव) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना हडपसर येथील सातव प्लॉट किराणा दुकानासमोर २ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता घडली होती़ या प्रकरणी शेख मोहसीन मोहमंद सादिक (वय २८, रा़ बनकर कॉलनी, हडपसर, मूळ रा़ सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे़ अमीन हरूण शेख (वय २०, रा. हडपसर) व इजाज याकूब बागवान (वय २५, रा. करकम, ता. पंढरपूर, ज़ि सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
सादीक हे मित्र रियाज शेंदुरे याच्यासह रुमवर जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या आरोपींनी हॉकी स्टीक, बॅट व दगडाने मारहाण करुन सादीक यांचा खून केला ़ या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते़ आरोपींकडून हॉकी स्टीक, बॅट जप्त करायची आहेत. याप्रकरणातील सूत्रधार कोण आहे याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्रा धरली.