‘केशवधून’ लघुपटात..!

By Admin | Updated: November 26, 2014 23:56 IST2014-11-26T23:56:31+5:302014-11-26T23:56:31+5:30

हातात हार्मोनिअम.. आणि कंठातून सुरांची उधळण करीत शहरातील गल्लीबोळात आपल्या पत्नीसमवेत फिरणारे संगीतवेडे म्हणजे केशवलाल.

'Hairstyle' shortcut ..! | ‘केशवधून’ लघुपटात..!

‘केशवधून’ लघुपटात..!

पुणो :  हातात हार्मोनिअम.. आणि कंठातून सुरांची उधळण करीत शहरातील गल्लीबोळात आपल्या पत्नीसमवेत फिरणारे संगीतवेडे म्हणजे केशवलाल. कोणापुढेही 
हात न पसरता केवळ संगीतालाच आयुष्याचे सर्वस्व मानणा:या या गायकाच्या निरपेक्ष वृत्तीची 
दखल ‘एफटीआयआय’चा 
विद्यार्थी रोचक साहू याने घेऊन लघुपटाची निर्मिती केली आहे. सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून या लघुपटाचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. 
सूर हाच केशवलाल यांचा श्वास असल्यामुळे आजही त्यांचा रस्त्यावरचा संगीतप्रवास अखंडपणो सुरूच आहे, हे विशेष. गणोश मंडळाच्या कार्यकत्र्यानी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना नुकतेच पुण्यात हक्काचे घर मिळवून दिले.
‘नागिन’ या चित्रपटातील प्रसिद्ध धूनमधील हार्मोनिअमचे जादुई सूर त्यांचेच. महेंद्र कपूर यांच्या वाद्यवृंदामध्येही त्यांनी काम केले. गेल्या 3क् वर्षापासून पुण्यातील रस्त्यांवर जुन्या हिंदी चित्रपटांमधील गीतांचे सादरीकरण करून लोकांचे ते 
आजही तन्मयतेने मनोरंजन करीत आहेत. 
संगीतासाठी आयुष्य समर्पित करणा:या या संगीतवेडय़ाची कहाणी विविध वृत्तपत्रंमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एफटीआयआयच्या  शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रॅक्टिक्ल्सच्या विषयासाठी केशवलाल यांच्यावरच लघुपट निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाल्याचे दिग्दर्शक रोचक साहू याने   सांगितले.  
हा लघुपट लोकांच्या पसंतीस उतरल्याचा मनापासून आनंद होत आहे. विविध आंतरराट्रीय महोत्सवांमध्येही हा लघुपट दाखविण्याचा मानस त्याने व्यक्त केला. (प्रतिनिधी)
 
4चित्रपट क्षेत्रतील मोठमोठय़ा व्यक्तींबरोबर काम केल्यामुळे मान्यवरांचा त्यांच्या घरी राबता असायचा. याचे त्यांना दडपण यायचे आणि त्यामुळेच त्यांनी मुंबई आणि चित्रपटाच्या झगमगाटाला राम राम ठोकला आणि ते पुण्यात आले.
4पैसे खूप कमावले; मात्र सगळे गमावल्यामुळे ना घर आणि खायला रोटी अशी त्यांची अवस्था झाली..हा त्यांचा  संपूर्ण जीवनपट लघुपटात मांडण्यात आला आहे. आपल्या पत्नीवर त्यांचे नितांत प्रेम. त्यांच्या नात्यातील घट्ट वीण यामधून त्यांनी कथन केली आहे. केवळ त्यांचा सांगीतिक पट नव्हे, तर माणूस म्हणून ते कसे होते याची प्रचिती यामधून येते. 

 

Web Title: 'Hairstyle' shortcut ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.