हडपसर - हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथून सोडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST2021-07-07T04:11:58+5:302021-07-07T04:11:58+5:30

पुणे : हडपसर स्थानकावर सुरू असलेले टर्मिनलचे काम लक्षात घेता ही गाडी लोणावळा येथून सोडावी, तसेच या गाडीची वेळ ...

Hadapsar - Hyderabad Express should leave from Lonavla | हडपसर - हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथून सोडावी

हडपसर - हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथून सोडावी

पुणे : हडपसर स्थानकावर सुरू असलेले टर्मिनलचे काम लक्षात घेता ही गाडी लोणावळा येथून सोडावी, तसेच या गाडीची वेळ बदलण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

हडपसर- हैदराबाद एक्स्प्रेस ९ जुलैपासून सुरू होत आहे. ही गाडी हडपसर स्थानकावरून दुपारी साडेतीन वाजता निघेल. हैदराबादला मध्य रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. प्रवाशांना हैदराबादला पोहोचण्याची वेळ ही अडचणीची आहे. मध्य रात्री पोहोचल्यावर प्रवाशांना स्थानकावरच थांबून राहावे लागणार आहे.त्यापेक्षा ही गाडी जर संध्याकाळी सहाच्या सुमारास हडपसर स्थानकावरून निघून सकाळी सहाच्या सुमारास हैदराबादला पोहोचली तर ते प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होईल.तसेच ही गाडी लोणावळा येथून जर सुरू केली. तर अप - डाऊन करणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. लोणावळा ते दौंड असा प्रवास करता येईल. तसेच हडपसर स्थानकावर होणाऱ्या असुविधेचा प्रवाशांना फटका बसणार नाही.

--------------------

प्रवाशांच्या प्रतिसादावर या गाडीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ही गाडी लोणावळा स्थानकावरून सोडावी, तसेच या गाडीच्या वेळेत बदल होणे गरजेचे आहे. हैदराबादला पोहोचण्याची वेळ ही अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे.

- हर्षा शहा,अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे

Web Title: Hadapsar - Hyderabad Express should leave from Lonavla