शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

'द काश्मीर फाइल्स' डाऊनलोड करताय... सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:37 IST

मोबाइलधारकांनो सावधान!

नम्रता फडणीसपुणे : सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ (the kashmir files) चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ओटीटीवर हा चित्रपट उपलब्ध असला तरी व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून चित्रपट मोफत डाऊनलोड करण्याचे आमिष दाखविले जात असून, ती लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या स्मार्ट फोनमधील डेटा हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायबर चोरांनी चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन हॅकिंगचा हा नवा फंडा शोधला आहे. त्यामुळे मोबाइलधारकांनो सावधान! असा इशारा सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या महाजालाने संवादाची विविध दालने खुली करीत माहितीचा स्रोतही उपलब्ध करून दिला आहे. परंतु इंटरनेटचे काही फायदे असण्याबरोबरच तोटेही अधिक आहेत, याची अनेकांना जाणीव नाही. कोरोनाकाळापासून ऑनलाइन व्यवहार अधिक वाढल्याने हॅकर्सने आपला मोर्चा डिजिटल माध्यमाकडे वळविला आहे.

व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेल्या लिंक लगेचच ओपन करणे किंवा डाऊनलोड करण्याचे प्रकार घडत असल्याने सायबर चोरांच्या हातात जणू आयतेच कोलीत मिळाले आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’ची लोकप्रियता कॅश करून मोबाइलमधील डेटा हॅक करण्याचा फंडा सायबर चोरांकडून वापरला जात आहे. राजस्थानमध्ये एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवर ‘द काश्मीर फाइल्स’ची लिंक पाठविण्यात आली आणि ती लिंक ओपन केल्यावर चित्रपट मोफत डाऊनलोड करण्याचे सूचित करण्यात आले. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर त्या व्यक्तीला ७१ लाख रुपयांचा गंडा बसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची लिंक पाठवून मोफत डाऊनलोड करण्यास सांगितल्यास ती करू नये असे सायबर तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

’द काश्मीर फाइल्स’द्वारे होतंय हॅकिंग; सायबरचोरांचा नवा फंडा-मोबाईलधारकाला व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठविली जाते. ती लिंक ओपन केल्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ मोफत डाऊनलोड करता येईल असे सांगितले जाते. जेव्हा त्या लिंकवर क्लिक केले जाते तेव्हा डाऊनलोड यंत्रणेद्वारे एकाड्राइव्हच्या माध्यमातून एक मेलवेअर मोबाईलमध्ये सोडला जातो. तो मेलवेअर स्मार्ट फोनला हॅक करतो. मोबाईलमध्ये सेव्ह करण्यात आलेली बँकेशी निगडित सर्व गोपनीय माहिती हॅक केली जाते अथवा तुमच्या मोबाईलमध्ये ज्या अॅप्सना परवानगी दिली आहे. त्यातील सर्व माहिती, फोटो हॅक केले जाऊ शकतात आणिनंतर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. मोबाईलधारकांनी व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या लिंक ओपन करू नयेत. आपल्या डिव्हाईसवर अँटीव्हायरस टाकून घ्यावा आणि तो वेळोवेळी अद्ययावत करावा.- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ’द काश्मीर फाल्स’सारख्या चित्रपटासंबंधी लिंक पाठवून त्या मोफत डाऊनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याद्वारे मोबाईलमधील डेटा हॅक केला जाऊ शकतो. याकरिताच कोणतीही गोष्ट फुकट मिळण्याची मानसिकता बदलायला हवी. ओळखीच्या व्यक्तींनी जरी लिंक पाठवली तरी ती ओपन करता कामा नये.- डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक सायबर सेल

टॅग्स :PuneपुणेThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड