शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पिरंगुट येथे अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त, कार चालक व एक अल्पवयीन ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 15:01 IST

विमल पानमसाला नावाची सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सची ८ पोती जप्त

पौड : पिरंगुट (ता.मुळशी) येथे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पौड पोलिस स्टेशन व एल.सी.बी.पुणे ग्रामीण पथकाने कारवाई केली. यामध्ये अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा व ओमनी कार असा साडेतीन लाख किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली.

याप्रकरणी कार चालक रामलाल छौगाजी चौधरी (वय ४३, रा. पिरंगुट कॅम्प) व काळुराम पवळे (अल्पवयीन) ता.मुळशी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करत असताना पुण्याच्या दिशेने पौडकडे एक मारुती ओमनी (एमएच. १२ एचएन.३०२८ ) ही भरधाव वेगात संशयितरित्या जात असल्याचे लक्षात आले. तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन भरधाव वेगात पुढे घेऊ गेले. त्यानंतर कारचा पाठलाग करून तिला पिरंगुट गावातील बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले. त्यावेळी कारमध्ये विमल पानमसाला नावाची सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सची ८ पोती मिळाली . 

ही कामगिरी पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,सहा.पोलीस निरीक्षक विनायक देवकर,पोलीस उपनिरीक्षक धोंडगे,सहा.फौजदार दत्ता जगताप, राजेंद्र पुणेकर, नितीन रावते, चंद्रशेखर हगवणे ,विनायक भोईटे यांनी केली.

टॅग्स :pirangutपिरंगुटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस